आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या दोन सभा झाल्या असत्या तर खैरे पडलेच नसते : रामदास कदम यांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - मराठवाड्याच्या राजधानीच्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत अगदी थोड्या फरकाने पराजित झाला. ही हार अगदी जिव्हारी लागणारी आहे. माझ्या दोन सभा झाल्या असत्या तर खैरे पडले नसते, असा दावा पर्यावरणमंत्री, औरंगाबादचे माजी पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी (१ आॅगस्ट) केला. त्या काळात आजारी असल्यामुळे मला प्रचारासाठी येता आले नाही. याचे मला दु:ख आहे, असेही ते म्हणाले. 
नांदेड दौऱ्यासाठी जाण्यापूर्वी कदम काही वेळ चिकलठाणा विमानतळावर थांबले होते. तेव्हा ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले की, हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे हिंदूंच्या मतांचे सरळसरळ विभाजन झाले. विधानपरिषद आगामी विधानसभेत आमचा विजय पक्का आहे. कदम यांच्या स्वागतासाठी बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ तसेच माजी महापौर त्र्यंबक तुपे आदी उपस्थित होते.