आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If India Win Today, It Will Be 12th Win Against Sri Lanka, India Sri Lanka Third Match On Today; Broadcast 7pm

भारत आज जिंकल्यास श्रीलंकेविरुद्ध ठरेल सलग बारा मालिका विजय, भारत-श्रीलंका तिसरा सामना आज; प्रसारण सायंकाळी 7 वाजेपासून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताकडून श्रीलंकेला 4 टी-20, 4 वनडे व 3 कसोटी मालिकेत पराभूत
  • आपण जिंकल्यास एका देशाविरुद्ध सर्वाधिक विजयाचा बनेल विक्रम

​​​​​पुणे : भारत व श्रीलंका यांच्यातील तिसरा व अखेरचा टी-२० सामना शुक्रवारी खेळवला जाईल. मालिकेत टीम इंडिया १-० ने पुढे आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारताने हा सामना जिंकल्यास, तो श्रीलंकेविरुद्ध सलग १२ वी द्विपक्षीय मालिका जिंकेल. यापूर्वी आपण श्रीलंकेला ४ टी-२०, ४ वनडे आणि ३ कसोटी मालिकेत हरवले आहे. आपण श्रीलंकेविरुद्ध गेल्या १२ वर्षांत मालिका हरलो नाही. अखेरच्या वेळी २००८ मध्ये श्रीलंकाने आपल्या घरच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला १-२ ने हरवले होतो. अशात टीम इंडिया विजयाचा आलेख कायम ठेवू इच्छितो.

अखेरच्या १८ मालिकांपैकी आपण १६ जिंकल्या, २ बरोबरीत राहिल्या

भारत व श्रीलंका यांच्यात तीन प्रकारांत खेळवण्यात आलेल्या १८ द्विपक्षीय मालिकेत आपण १६ मध्ये विजय मिळवला. २ मालिका बरोबरीत राहिल्या. या दरम्यान आपण ५ टी-२०, ७ वनडे आणि ४ कसोटी मालिकेत विजय आहे. एक टी-२० व एक कसोटी मालिका बरोबरीत राहिली. श्रीलंका टीम आपल्याला कधीही टी-२० मालिका हरवू शकली नाही. यंदाही अखेरच्या सामन्यात श्रीलंका टीमने विजय मिळवल्यास मालिका १-१ ने बरोबरीत राहील.

संभाव्य संघ

भारत : धवन, लोकेश राहुल, कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिग्टन सुंदर, चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, बुमराह

श्रीलंका : गुनातिलिका, अविष्का फर्नांडो, कुशल परेरा, राजपक्षे, ओ फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, शनाका, धनंजया, हसारंगे, मलिंगा, कुमारा.

कोहली कर्णधार म्हणून ११ हजार धावांपासून १ पाऊल दूर

विराट कोहली कर्णधार म्हणून तिन्ही प्रकारांत (कसोटी, वनडे, टी-२०) ११ हजार धावांपासून एक पाऊल दूर आहे. कोहली आतापर्यंत १६८ सामन्यांत १९५ डावांत ६७ च्या सरासरीने १०, ९९९ धावा केल्या. यात ४१ शतके व ४० अर्धशतके आहेत. कोहलीने १ धाव काढताच, तो अशी कामगिरी करणारा जगातील सहावा व भारताचा दुसरा कर्णधार बनेल. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (१५४४०), द. आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ (१४८७८), न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग (११५६१), भारताचा धोनी (११२०७) व ऑस्ट्रेलियन अॅलेन बॉर्डरने (११०६२) अशी कामगिरी केली.

८० सामने जिंकणारी बनेल दुसरी टीम

भारताने हा टी-२० मध्ये आतापर्यंत १२८ सामन्यांपैकी ७९ सामने जिंकले आहेत. जर भारताने मालिकेतील अखेरचा सामना जिंकल्यास, ८० सामने जिंकणारी दुसरी टीम बनेल. पाकिस्तानने सर्वाधिक ९० सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका (६१) तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया (६५) चौथ्या आणि न्यूझीलंड (६१) पाचव्या स्थानी आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला टी-२० मध्ये १२ वेळा हरवले. संघाने हा सामना जिंकल्यास एका देशाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याच्या विक्रमाशी देखील बरोबरी करेल. पाकिस्तानने श्रीलंका व न्यूझीलंड विरुद्ध १३-१३ विजय मिळवले आहेत.

या मैदानावर श्रीलंकेकडून भारताचा पराभव

भारतीय संघाने पुण्यात आतापर्यंत २ टी-२० सामने खेळले. २०१२ मध्ये त्यांना इंग्लंड विरुद्ध ५ गड्यांनी विजय मिळाला. २०१६ मध्ये श्रीलंकेने आपल्याला ५ गड्यांनी पराभूत केले. श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया केवळ १०१ धावा करू शकली होती. श्रीलंका संघ या सामन्यात पराभूत झाल्यास त्याचा सलग पाचवा पराभव ठरेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने त्यांना ३-० ने हरवले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...