international / इराणला जर युद्ध हवे असेल तर त्याचा अंत होईल; अध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेची यूएसएस अब्राहम लिंकन ही युद्धनौका अरबी समुद्रात तैनात आहे. अमेरिकेची यूएसएस अब्राहम लिंकन ही युद्धनौका अरबी समुद्रात तैनात आहे.

इराकमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला, अमेरिका झाली नाराज

वृत्तसंस्था

May 21,2019 10:55:00 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणला युद्ध हवे असेल तर त्या देशाचा अधिकृत अंत होईल, इराणने अमेरिकेला धमकी देऊ नये, असे ट्विट ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांनी रविवारी रात्री इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ल्यानंतर हा इशारा दिला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनीही म्हटले आहे की, अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे. पुढील स्थितीची जबाबदारी इराणची असेल. अमेरिकेच्या सैनिकांनी मध्य-पूर्वेत उपस्थिती वाढवली आहे. तेथे पॅट्रिएट क्षेपणास्त्रे, बी-५२ बॉम्बवर्षक आणि एफ-१५ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, इराणशी युद्ध टाळण्यात येईल. त्याच्या उत्तरात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांनी म्हटले की, इराणची अमेरिकेशी युद्ध करण्याची इच्छा नाही,पण आमचा अमेरिकेला विरोध सुरूच राहील.
बगदादमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ इराण समर्थित भागातून झाला हल्ला: इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला करण्यात आला. इराकच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. ते एका सैनिकाच्या पुतळ्याजवळ पडले. रॉकेट पूर्व बगदादमधून डागण्यात आले होते. या भागात इराणसमर्थक शिया लोकांचा प्रभाव आहे.

पुढे काय : ट्रम्प यांची धमकी, पण त्यांच्याच देशात त्यांच्या म्हणण्यास महत्त्व नाही

अमेरिका : नेते म्हणतात, देश अजून इराक युद्ध विसरला नाही

ट्रम्प यांना इराण प्रकरणी आपल्या पक्षाशिवाय कोणाचाही पाठिंबा नाही. माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनीही म्हटले आहे की, अमेरिकेने आता युद्ध करू नये. इराकशी झालेले युद्ध देश विसरला नाही. त्यामुळे इराणशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेचे नुकसान होऊ शकते. अमेरिकेकडे इस्रायल आणि अरब देशांशिवाय कोणीही सहकारी नाही.

इराण : अमेरिकेने ३९ वर्षांपूर्वीचे धोरण अवलंबू नये हीच चिंता

१९८० मध्ये इराकने इराण सीमेवर हल्ले केले होते. तो मानत होता की, अंतर्गत राजकारणामुळे इराण कमकुवत झाला आहे. सीमा वाद असलेल्या इराणच्या भागावर कब्जा करण्यास ही चांगली संधी आहे. इराणचे सध्याचे सर्वोच्च नेेते अयातुल्लाह अली खोनेनी यांच्या मते, अमेरिकेनेच इराकला इराणवर हल्ला करण्यास परवानगी दिली होती.

मध्य-पूर्व: अमेरिका १.२० लाख सैनिक तैनात करण्याच्या तयारीत

ट्रम्प यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याच महिन्यात बैठक झाली होती. तीत कार्यकारी संरक्षणमंत्री पॅट्रिक शॅनहन यांनी मध्य-पूर्वेत अमेरिकी लष्कराची योजना सादर केली होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिका मध्य-पूर्वेत १.२० लाख सैनिक पाठवण्यावर विचार करत आहे. अमेरिकेने तेवढेच सैनिक २००३ मध्ये इराकवर हल्ला केला तेव्हा पाठवले होते.

X
अमेरिकेची यूएसएस अब्राहम लिंकन ही युद्धनौका अरबी समुद्रात तैनात आहे.अमेरिकेची यूएसएस अब्राहम लिंकन ही युद्धनौका अरबी समुद्रात तैनात आहे.
COMMENT