आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूड डेस्क - कंगना रनोट सध्या 'जजमेंटल है क्या' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती नुकतीच 'द कपिल शर्मा शो'मध्ये गेली होती. दरम्यान यावेळी तिने अभिनेत्री करिना कपूरचे तोंडभरून कौतुक केले. सोनी टीव्ही आणि कंगनाच्या टीमने तिचा कपिलसोबत मस्ती करत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती करिनाचे कौतुक करत असल्याचे दिसत आहे.
करिना व्यतिरिक्त आणखी कोणी चांगला गृहमंत्री मिळू शकत नाही
कंगना जर बॉलीवूडची पंतप्रधान झाली तर गृहमंत्रीपद कोणत्या सुपरस्टारला सोपवण्यात येईल असा प्रश्न शोमध्ये विचारण्यात आला. यावर कंगनाने करिना कपूरचे नाव घेतले. ती म्हटली की, करीना आपले घर, मुलगा, परिवार, पती आणि करिअर अगदी उत्तमप्रकारे सांभाळते. या सर्वात ती स्वतःकडे लक्ष देते. यामुळे मला नाही वाटत की तिच्याशिवाय आणखी कोणी चांगला गृहमंत्री मिळू शकेल. ती आमच्यासाठी एक प्रेरणा आहे. कंगना हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम देखील शेअर करण्यात आला आहे.
कंगनाचा 'जजमेंटल है क्या' 26 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि ट्रेलर जारी रिलीज करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.