• Home
  • News
  • 'If Karan and I are together, we don't need anyone' : Bipasha Basu

व्हॅलेन्टाईन डे / 'करण आणि मी सोबत असलो तर आम्हाला कुणाचीही गरज पडत नाही' : बिपाशा बासू

व्हॅलेन्टाईननिमित्त पाहुयात आपले काही सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरविषयी काय सांगतात 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 12:08:49 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क : व्हॅलेन्टाईन डेचा सिझन सर्वांसाठी विशेष असतो. तर मग तो आपल्या सेलिब्रिनसाठी तरी कसा अपवाद ठरणार. याच व्हॅलेन्टाईननिमित्त पाहुयात आपले काही सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनर्स विषयी काय काय गुपितं सांगतात.


बिपाशा बासूने कारण आणि तिच्या नात्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, "करण आणि माझी पहिली भेट 'अलोन' चित्रपटाच्याप्रसंगी झाली होती. आम्ही मुंबईच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटलो होतो. त्याला पाहताच मी त्याच्या प्रेमात पडले. तो किती हँडसम आहे, याचा मी विचार करू लागले. नंतर बोलताना तो विनोदी असल्याचेही कळाले. या चित्रपटात माझा सहकलाकार एक मजेदार माणूस आहे, आता टेंशन नाही, असे मी विचार करू लागले. त्या भेटीनंतर तो माझा जोडीदार होईल याचा मी कधी विचारही केला नव्हता.


पहिल्या भेटीनंतर आम्ही रोज बोलायला लागलो. त्यानंतर हळू-हळू आमची मैत्री घट्ट झाली. तो दिवस आणि आजचा दिवस आम्ही आजही पक्के मित्र आहोत. सेटवर जेव्हा शूटिंग नसायची तेव्हा आम्ही एखाद्या विषयावर तास ना तास बोलायचो. आजही आम्ही तसेच वागतो. सोबत असतो तर बोलत बसतो, आम्हाला वैताग येत नाही. जेव्हा आम्ही सोबत असतो तेव्हा तिसऱ्याची गरज पडत नाही. डेटिंग केल्यानंतर एक दिवस ३१ डिसेंबर २०१५ मध्ये करणने मला लग्नाची मागणी घातली. प्रपोज करणे माझ्यासाठी सरप्राइजिंग होते. कारण त्यावेळी लग्न करण्याच्या मन:स्थितीत मी नव्हते. कारण एक दिवस आधी आमचे कडाक्याचे भांडण झाले होते आणि कारण खूप छोटे होते. त्यामुळे मी नाराज होते. दुसऱ्या दिवशी आमची शूटिंग हाेती. त्या शूटिंगमध्ये करण माझ्याकडे आला आणि त्याने सेल्फी घेत अंगठी देत मला प्रपोज केले आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली."

X
COMMENT