आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही अायाेगासमाेर साक्षीसाठी बाेलावणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी राेजी दाेन गटांत दंगल उसळली हाेती. या घटनेची याेग्य प्रकारे हाताळणी करण्यास शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याने शासनाचे प्रमुख अाणि गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर शासकीय अधिकाऱ्यांना काेरेगाव भीमा चाैकशी अायाेगासमाेर बाेलावून त्यांची साक्ष नाेंदवावी, अशी मागणी अॅड. प्रकाश अांबेडकर यांनी प्राचार्य म.ना.कांबळे यांच्या वतीने अर्ज करत मंगळवारी केली. यावर न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांनी भक्कम पुरावे गोळा झाल्यानंतर गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांना अायाेगासमाेर साक्षीसाठी बाेलावण्यात येईल, असे सांगितले.  सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांना बाेलावणे उचित नाही. अायाेगाच्या कारभारात सरकारचा  हस्तक्षेप नसून अायाेगासमाेर अालेली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


म.ना.कांबळे, सुधीर ढवळे, हर्षाली पाेतदार, रमेश गायचाेर यांच्या वतीने अायाेगासमाेर वैयक्तिक अर्ज सादर करून मुख्यमंत्री, पाेलिस महासंचालक, गृहराज्यमंत्री, गुप्तचर खाते प्रमुख यांची प्रथम साक्ष नाेंदवावी. ज्या गुन्ह्यांचा तपास करण्यात येत अाहे, त्याबाबतची कागदपत्रे मिळावीत, काेणत्याही साक्षीदाराला अचानक प्रश्न विचारण्यात येऊ नये, अशा विविध मागण्या करण्यात अाल्या अाहेत. अायाेगाने याप्रकरणी एकत्रित सर्वांच्या मागण्या एेकून घेत याबाबत मुंबर्इ येथे अायाेगासमाेर एकत्रित प्रतिज्ञापत्र सादर करा, असे सांगितले अाहे.

 
या वेळी अॅड. अांबेडकर म्हणाले, सरकारी यंत्रणा कुठे निष्क्रिय झाली, याप्रकरणात काेण गुन्हेगार अाहे, काेणत्या संघटनांचा यात सहभाग अाहे, याचा खुलासा अायाेगासमाेर हाेणे अावश्यक अाहे. घटनेच्या दिवशी काेरेगाव भीमा येथील नियाेजनासाठी दाेन राज्यमंत्री शासनाच्या वतीने व्यवस्था पाहत हाेते. घटना घडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसाेबत फाेनवर काय बाेलणे केले, काेणते निर्णय घेतले, मुख्यमंत्र्यांनी काेणते अादेश दिले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे केली या गाेष्टींचा उलगडा हाेणे गरजेचे अाहे. घटनास्थळापासून मुख्यमंत्री शनिशिंगणापूर येथे ४० किलाेमीटरवर हाेते. त्यामुळे घटनेच्या दिवशीचे सरकारी पातळीवरील अाॅडिअाे अाणि लेखी दस्तऐवज अायाेगासमाेर यावेत. या प्रकरणात पाेलिस, महसूल, गुप्तचर, तलाठी, ग्रामसेवक या अधिकाऱ्यांची चाैकशी व्हावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

 
पाेलिसांची दाेन वेगळी प्रतिज्ञापत्रे : आंबेडकर   
अॅड. अांबेडकर म्हणाले, काेरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर काेल्हापूर परिक्षेत्राचे पाेलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी चाैकशीसाठी एक सत्यशाेधन समिती स्थापन केली. त्यामध्ये पुण्याचे उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे, प्राचार्य एम.एन.कांबळे, सर्जेराव वाघमारे, विशाल साेनवणे, अॅड.राहुल मखरे, रमाकांत खांदे, श्याम गायकवाड, दत्ता पाेळ यांचा सहभाग हाेता. त्याच वेळी समांतरपणे चाैकशी करणाऱ्या गुप्तचर खात्याने घटनास्थळ परिसरात एका विशिष्ट जिल्ह्यातील माेबाइल नंबर माेठ्या प्रमाणात २८ डिसेंबर ते एक जानेवारीदरम्यान अाढळून अाले अाहेत. पुणे ग्रामीण पाेलिसांनी सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र अाणि पुणे पाेलिसांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र यामध्ये तफावत अाहे.

 

एरवी जहरी टीका करणाऱ्या संभाजी भिडे, एकबाेटेंचा नामाेल्लेख अांबेडकरांनी अायाेगासमाेर मात्र टाळला   
प्रकाश अांबेडकर अायाेगासमाेर दाखल झाल्यानंतर त्यांनी संभाजी भिडे अाणि मिलिंद एकबाेटे यांचे नाव घेणे टाळले. याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘पाेलिसाचे प्रतिज्ञापत्र अायाेगासमाेर सादर करण्यात अाले असून ते बाेलके आहे. त्याअाधारे अायाेगाला निर्णय घेणे साेपे अाहे, असे सांगत सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करणे अाणि न्यायालयात वक्तव्य करणे वेगळ्या बाबी असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही अायाेगासमाेर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काेणतीही विशिष्ट व्यक्ती अथवा संघटनेचे नाव घेणे टाळले हाेेते. याकडे लक्ष वेधले असता अॅड. अांबेडकर म्हणाले, ‘पवार यांचे प्रतिज्ञापत्र अद्याप मी वाचलेले नाही, त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. एल्गारला लक्ष्य करण्यात येत असून त्याचे अायाेजक काेण हाेते, परिषदेचा हेतू काय हाेता, ती का अायाेजित करण्यात अाली हाेती, या परिषदेमुळे काेरेगाव भीमा घटना घडली या बाबी पडताळून पाहाव्यात.’   

बातम्या आणखी आहेत...