Home | National | Other State | If Pak make a third mistake, then they will realize that they will fall into the trap : Modi

मोदींचा पाकवर पुन्हा निशाणा, तिसरी चूक केली तर महागात पडेल हे पाकला कळले : मोदी

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 15, 2019, 08:58 AM IST

मोदींची जम्मूत १, यूपीत २ सभा

  • If Pak make a third mistake, then they will realize that they will fall into the trap : Modi

    कठुआ/मुरादाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या कठुआ, यूपीच्या अलिगड आणि मुरादाबादमध्ये सभा घेतल्या. मुरादाबाद येथून मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला. ते म्हणाले की,'ज्याच्याकडे ताकद आहे त्याचेच जगात ऐकले जाते. आधी काय होत होते? पाकिस्तानमधून दहशतवादी येत असत, आपल्याकडे हल्ले करत असत. काँग्रेस सरकार फक्त रडत होते. आजचा भारत नवा आहे. दहशतवाद्यांच्या म्होरक्यांनी उरीत चूक केली तर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केला. दुसरी चूक पुलवामात केली तर आपण त्यांना एअर स्ट्राइक करत घरात घुसून मारले. आता पाकिस्तानलाही हे समजले आहे की, तिसरी चूक केल्यास खूप महागात पडेल. आज तुमचा चौकीदार तुमच्यामध्ये उभा आहे. पाकिस्तान जगभर रडत आहे.' तत्पूर्वी, कठुआ येथील प्रचारसभेत मोदींनी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सवर जोरदार टीकास्त्र सोडले.

    आसाममधून प्रियंकांचा हल्ला- मोदी सरकारकडे ना धोरण, ना इच्छा

    सिलचर (आसाम) - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी प्रथमच यूपीबाहेर प्रचारासाठी निघाल्या. रविवारी त्यांनी आसामच्या सिलचरमध्ये काँग्रेस उमेदवार सुष्मिता देव यांच्यासाठी रोड शो केला. त्या म्हणाल्या की, मोदी सरकारकडे ना इच्छा आहे, ना धोरण. सरकार आल्यास देव यांना मंत्री करू.

Trending