आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानामध्ये 'प्लास्टिक' आढळल्यास परवाना रद्द; राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- यापुढे कोणत्याही दुकानात कॅरीबॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळून आल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्याचे अादेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी दिले. मंत्रालयात प्लास्टिक बंदीसंदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते. 


कदम म्हणाले, ई-कॉमर्ससाठी लागणाऱ्या प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियलला फक्त ३ महिन्यांसाठी विक्रीची मुभा होती. ती मुदत अाता संपली. दुकानदारांनी प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियलऐवजी अन्य पर्यावरणपूरक पर्याय वापरावेत. नवरात्र, दसरा व दिवाळीतही थर्माकोल-प्लास्टिकचा वापर टाळवा. गुजराततेतून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येत असल्याचे सांगून कदम म्हणाले, पोलिसांनी हे ट्रक जप्त करावेत. दुकानात प्लास्टिक आढळल्यास कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस करावी. पर्यटन आणि देवस्थानच्या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग वापरल्या जातात. तेथेही पोलिस व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. जिल्हा परिषद, मनपा, नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या तयार करुन त्या दुकानांवर आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. लवकरच २५ लाख पिशव्या तयार होत असून त्या बाजारात उपलब्ध होतील. 

बातम्या आणखी आहेत...