• Home
  • National
  • Delhi
  • if rahul gandhi resigns congress president post then it will be trapped by bjp said by priyanka gandhi

Election / 'जर राहुल यांनी राजीनामा दिला तर ते भाजपच्या जाळ्यात अडकतील'- प्रियंका गांधी


लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या राज्य सरकारवरचे संकट वाढतच आहे

दिव्य मराठी वेब टीम

May 26,2019 01:09:00 PM IST

नवी दिल्ली- लोकसभेत खराब कामगिरीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. पण पक्षाचे नेते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीदेखील त्यांना समजवले की, जय-पराजय तर होतच असतो. पण राहुल यांनी आपले पद सोडू नये. शनिवारी काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत राहुल यांनी राजीनामा देण्याचे बोलले होते. पण बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी या मागणीला नकार दिला. ते म्हणाले की, पक्षाला मजबुत करण्यासाठी सदैव काम करतच राहू, पण राहुल यांनी आपला राजीनामा परत घ्यावा.

यानंतर राहुल म्हणाले की, गांधी कुटुंबाव्यतिरीक्त कोणीही अध्यक्ष बनू शकतो. पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी याप्रकरणी सोनिया गांधींनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली, पण त्यांनी यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले. पण प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या की, जर राहुल यांनी राजीनामा दिली तर, ते भाजपच्या जाळ्यात अडकलीत. कार्यसमितीच्या बैठकीत राहुल म्हणाले की, पक्षाचे काही नेते आणि मुख्यमंत्री आपल्या मुलांना पुढे-पुढे करण्यात लागले आहेत. यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर राहुल यांनी राजीनामा दिला तर पक्षाचा अध्यक्ष कोण होणार ?


अनेक राज्यांवर संकट
लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक आणि मध्य प्रदेश राज्यातील सरकारवरील संकट वाढक आहे, तसेच राजस्थानमध्येही असंतोषाचे सुर सुरू झाले आहेत. याशिवाय पुढील 8 महिन्यात दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधासभेच्या निवणुका होत आहेत. या राज्यात दिल्ली आणि हरियाणामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी जो कोणी बसेल, त्याला या राज्यात मोठे काम करावे लागेल.

X
COMMENT