Home | International | Other Country | If Talibani's return then freedom of women will end - Angelina Jolie

तालिबानी परतल्यास महिलांचे स्वातंत्र्य हिरावण्याचा धाेका - अँजेलिना जोली

अँजेलिना जोली | Update - Apr 14, 2019, 10:46 AM IST

कतारच्या शांतता चर्चेत महिलांची उपस्थिती आवश्यक, संसदेसह नागरी सेवांमध्ये एक-तृतीयांश महिला 

 • If Talibani's return then freedom of women will end - Angelina Jolie

  काबूल - अफगाणिस्तानात १९९६ मध्ये तालिबान्यांनी सत्ता हिसकावून अफगाणी महिलांविराेधात युद्ध छेडून मुलींच्या शिक्षणावर बंदी लादली. तसेच महिलांचे विश्व घरापर्यंतच सीमित केले व त्यांचे काम करण्याचे अधिकार काढून घेतले. त्यांना अमानवी यातना देऊन अनेक महिलांचे प्राणही घेतले. लाखो अफगाणी नागरिकांसाठी या साऱ्या जिवंत अाठवणी असून, हा पुन्हा चिंतेचा विषयही बनला अाहे. कारण अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी तालिबान्यांशी समझाेता हाेण्यावर चर्चा करत अाहेत. मात्र, यामुळे तालिबानी अफगाणच्या सत्तेत पुन्हा परतू शकतात.


  तालिबानी सत्तेत परतल्यास महिलांचेच सर्वाधिक नुकसान हाेऊ शकते. कारण चर्चेच्या या प्रक्रियेत त्यांना काेणतेही स्थान देण्यात अालेले नाही. शांतता समझाेत्याने महिलांवरील अन्याय व छळाचा नवा काळ सुरू झाल्यास स्थिरता कायम राहणार नाही. अशा स्थितीत काही ठाेस पावले उचलण्याची गरज अाहे. त्यात अफगाण सरकारच्या प्रतिनिधींमध्ये महिलांना स्थान मिळावे, अफगाण चर्चेचे यजमानपद स्वीकारणाऱ्या कतारने अशा प्रतिनिधींना आमंत्रित करून याबाबतच्या अजेंड्यात महिलांचे हक्क समाविष्ट करावेत. शांतता प्रक्रियेत अमेरिकेची महत्त्वाची भूमिका असल्याने अफगाणी महिलांना त्यांच्याकडूनही अपेक्षा अाहेत. कारण महिलांच्या हक्कांवर काेणतीही गदा येणार नाही, हेही अफगाणमध्ये लढणाऱ्या अमेरिकेसह इतर देशांना पाहावे लागेल. अफगाणी महिलांना संबंधित संघटनेसमाेर स्वहक्कांच्या रक्षणासाठी एकटे पाडले जाऊ नये. अफगाणिस्तानात महिलांसाठी समान अधिकारांना विरोध करणारे दावा करू शकतात की, हा पश्चिमेचा अजेंडा आहे. मात्र, अफगाणी महिलांना अमेरिकी महिलांच्या तुलनेत शंभर वर्षांपूर्वी १९१९ मध्ये मतदानाचा हक्क मिळाला हाेता. १९६० च्या अफगाणी राज्यघटनेने समानतेची खात्री दिली हाेती. दरम्यान, हिंसा व छळाचा सामना करून अापल्या मुलींना शिक्षण देणाऱ्या अनेक अफगाणी निर्वासित पित्यांची मी भेट घेतली अाहे.
  ही शांतता चर्चा तालिबान्यांत बदल झाला काय व समझाेता करेल काय, या अाशेवर आधारित अाहे. चर्चेत महिलांच्या सहभागानेच तालिबानची स्थिती स्पष्ट हाेईल. अफगाणी महिलांचा विकास जसा अाहे तसाच स्वीकारावा लागेल. अफगाणिस्तानात युद्ध हा अामच्या पिढीच्या परराष्ट्र धाेरणाचा महत्त्वाचा मुद्दा अाहे. इतक्या बलिदानांनंतर याेग्य अटींवर हा संघर्ष संपवला पाहिजे.

  संसदेसह नागरी सेवांमध्ये एक-तृतीयांश महिला
  अफगाणी महिला सर्वत्र क्षेत्रांत सक्रिय असून, संसदेसह नागरी सेवांमध्ये जवळपास एक-तृतीयांश महिला आहेत. त्या प्राध्यापक, कलाकार, पत्रकार, वकील, न्यायाधीश, पाेलिस, लष्करातही असून. अमेरिकेत अफगाणची राजदूतही महिलाच आहे.

Trending