आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If The Bride's Father Has Given Her A Dowry Then Court Said "if It Is A Crime To Get A Dowry, Then Giving It Is Also A Crime."

वधूच्या पित्याने दिला हुंडा तर तर कोर्टाने दिली ही शिक्षा, म्हणाले - 'हुंडा घेणे अपराध आहे तर देणेसुद्धा अपराधच आहे'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : एका प्रकरणी राजस्थान कोर्टाने एक पित्यावर आपल्या मुलीच्या सासरच्यांना हुंडा दिल्या प्रकरणी केस दाखल केली आहे. जोधपुरच्या मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटने मुलीचे पिता सेवानिवृत्त कर्मचारी रामलाल यांच्यावर हुंडा दिल्याने प्रकरण दाखल झाले आहे. मुलीचे पिता रामलालने सांगितले की, त्यांनी मुलीच्या सासरच्यांना हवा तेवढा हुंडा दिला होता आणि एक लाख रुपये नगदी पाकिटात दिले होते. त्यांची मुलगी मनीषाचे लग्न 2017 मध्ये झाले होते. यावर मनीषाचे सासरे जेठमलने हे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. बचाव पक्षाचे वकील ब्रजेश पारीकने ही महिरती दिली. पारीक म्हणाले, 'आमचे असे म्हणणे आहे की, जर हुंडा घेणे अपराध आहे तर मकग हुंडा देणेही अपराध आहे आणि कोर्टाकडे रामलालवर हुंडा देण्याचा आरोप करून प्रकरण दाखल करण्याची अपील केली.'

 

अपील स्वीकारून मॅजिस्ट्रेट ऋचा चौधरीने पोलिसांना मुलीच्या पित्याविरुद्ध हुंडा दिल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकारबानी पुढील सुनावणी होणार आहे. पारीकने सांगितले की, असे पहिल्यांदा झाले आहे जेव्हा हुंड्याच्या प्रकरणात हिंदू विवाह अधिनियम च्या कलम तीनचा वापर केला गेला आहे आणि हुंडा देणाऱ्याच्या विरोधात प्रकरण दाखल करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. मनीषाचे लग्न सॉफ्टवेयर इंजीनियर कैलाशसोबत 2017 मध्ये झाले होते. मुलीच्या पित्याने सासरच्या मंडळींवर हुंड्याच्या नावाखाली मनीषाचा छळ करणे आणि आणि तिच्या पतीसोबत राहून ना दिल्याचा आरोप केला होता. आणि तक्रार दाखल केली होती. कैलाश नोएडामध्ये नोकरो करतो.