आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती झाल्यास लाटेतील खासदाराला भाजपातून होऊ शकतो तीव्र विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बुलडाणा : लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास भाजपसोबत युती असावी,असे मत सेनेच्या काही खासदारांचे आहे.पण त्याला पक्षप्रमुखांनी थारा न दिल्यामुळे काम न करणाऱ्या व मोदी लाटेत तरणाऱ्या खासदार आता चिंतेत आहेत. तर शेवटी येनकेन प्रकारे युती झालीच तर केवळ लाटेत निवडुन येणाऱ्या खासदाराला आता भाजपातूनच विराेध होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांकडून काही मिळेना व ज्याला मोदी लाटेत लाखाच्या मताधिक्याने निवडून आणले तो लक्ष देईना, अशी स्थिती भाजप कार्यकर्त्यांची झाली आहे. नेतेही कार्यकर्त्यांच्या भावना जपण्यासाठी विरोध करण्याची शक्यता आहे.यातून उमेदवार बदलून मिळण्याची मागणीसुद्धा भाजपच्या वतीने हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोकहिताच्या योजना आणल्या. त्या केंद्रस्तरावरील योजना असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना या योजनांची पूर्तता जिल्हयात योग्यरीतीने होणे अपेक्षित होते. त्या दृष्टीने जिल्हास्तरावर कार्यकर्ते हे काम करण्याचा प्रयत्न करत असताना मोदींच्या लाटेवर निवडून आलेल्या शिवसेनेच्या खासदाराकडून या योजनांबाबत कधीच उत्साह दिसून आला नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही कधी त्यांनी कोणते काम देण्याचा प्रयत्न केला नाही. याचा रोष मनात खदखदत अनेक कार्यकर्ते फक्त आता निवडणुकीची संधी शोधत आहेत. ही संधी आता जवळ आल्याने त्याचे सोने करायचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे.याची भणक भाजपच्यानेत्यांना लागली असून त्यांनीही यावर आता विचार करणे सुरु केले आहे. त्यामुळे भाजपशी युती झाली किंवा नाही झाली तरी शिवसेनेने आपल्या बळावर लोकसभा निवडणूक लढायची तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. ऊठसुठ जे दिसेल ते काम खासदारानेच केल्याचे सांगत फिरण्याचे काम सेनेचे पदाधिकारी करीत आहेत. दहा वर्षांतील विकासाच्या नावाने लोक बोंबा ठोकत असल्यामुळे काय केले हे सांंगण्याचे काम सेनानेत्यांना आता करावे लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जुने नामफलकावर नवीन रंग भरुन कार्यकारिणी गठित केल्या जात आहे. 


बंद सेवेचे खासदारांच्या हस्ते झाले उद्घाटन 
ग्राहकांसाठी अत्याधुनिक सेवा देण्यासाठी फोर जी सेवेचे उद््घाटन बीएसएनएलच्या वतीने खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. ज्या फोर जी चे उद््घाटन खासदारांनी केले. ती बीएसएनएल यंत्रणा गेल्या महिन्यापेक्षा अधिक काळापासून नेटवर्कची सेवा देण्यास असक्षम ठरत आहे. ज्या दिवशी उद््घाटन केले त्या दिवसानंतर नेट प्राब्लमच सुरु आहे. या बंद पडणाऱ्या सेवेचे उदघाटनही खासदारांच्या हस्ते होणे ही सुध्दा गमतीची बाब बनली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...