आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी आरक्षणात धनगरांनी घुसखोरी केल्यास राज्यभर आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव शहर -  देशातील वंचित घटक म्हणून आदिवासी जमातीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्यात आले. मात्र, सध्या धनगर समाज आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी करू पहात असून तसे झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी दिला. महाराष्ट्राचा रॉबिन हूड म्हणून ओळखले जाणारे आद्य क्रांतिकारक तंट्यामामा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ढवळे बोलत होते. 

 

ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांत शासकीय योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचवण्यात आतापर्यंतचे सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरले. सरकार या समाजाला शिक्षण व रोजगार देण्यास अपयशी ठरला आहे. आता या योजना गिळंकृत करण्याच्या उद्देशाने धनगर समाज आदिवासी आरक्षणात घुसखोरी करू पहात आहे. 

 

कार्यक्रमाआधी साईबाबा कॉर्नर ते आंबेडकर मैदान अशी रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तंट्यामामा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गोरख नाईक यांनी केले. याप्रसंगी प्रदेश सचिव किरण ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष पवन सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश औताडे यांनी केले, तर आभार गोरख नाईक यांनी मानले. कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अशोक माळी, युवा जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे, जिल्हा संपर्कप्रमुख अशोक मोरे, जिल्हा सचिव रंगनाथ आहेर, युवा जिल्हा सचिव दीपक ठाकरे, युवा कार्याध्यक्ष भाऊराव पवार, सुनील वाघ, उत्तम पवार आदी उपस्थित होते. 
एकलव्य संघटनेचे संस्थापक ढवळेंचा इशारा 

बातम्या आणखी आहेत...