Home | International | Other Country | If the employee will resign, the software will know in advance

कर्मचारी कधी राजीनामा देणार, हे सॉफ्टवेअरने अगाेदरच कळणार; हे साॅफ्टवेअर ९५ % अचूक काम करते : कंपनीचा दावा

वृत्तसंस्था | Update - Apr 12, 2019, 11:34 AM IST

ह्युमन रिसोर्स सॉफ्टवेअरद्वारे आयटी कंपनी नाेकरी साेडून दुसऱ्या जागी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राेखतेय

  • If the employee will resign, the software will know in advance

    वॉशिंग्टन - तुम्ही नाेकरी साेडण्याचा विचार करत असाल तर याबाबतची भविष्यवाणी आता एका साॅफ्टवेअरच्या माध्यमातून हाेणार आहे. जगप्रसिद्ध आयबीएम कंपनीने हे साॅफ्टवेअर तयार केले असून, ते कंपनीला कर्मचाऱ्यांबाबत सर्व माहिती देणार आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्सने परिपूर्ण असलेले हे साॅफ्टवेअर ९५ % अचूक निर्णय देत असल्याचा दावाही आयबीएमने केला आहे. कंपनी सध्या या तंत्रज्ञानाचा वापर कर्मचाऱ्यांनी नाेकरी साेडून इतरत्र जाऊ नये यासाठी करत आहे. न्यूयॉर्कमधील ह्यूमन रिसोर्स परिषदेत आयबीएमच्या सीईओ गिन्नी रोमेटी यांनी ही माहिती दिली.


    गिन्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार आयबीएम कर्मचाऱ्यांना नाेकरी साेडण्यापासून राेखण्यात यशस्वी झाली आहे. दुसऱ्या कंपनीत जाण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना समजावून सांगणे किंवा समजून घेणे, हाच त्यांना पहिल्या कंपनीत कायम ठेवण्याचा चांगला उपाय आहे.

Trending