आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांवर सूज येतेय, तर मग करून पाहा पुढील पाच उपाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कित्येकदा थकवा किंवा झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळ्यांवर सूज येते. याला दूर करण्यासाठी या पाच पद्धतींचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो.

१. पाणी जास्त प्यावे
कित्येकदा शरीरात असणाऱ्या विषारी द्रव्यामुळे डोळ्यांवर सूज येऊ शकते. म्हणून दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायची सवय लावा. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहील आिण पफी आईजचा त्रास होणार नाही.

२. टी बॅग्स : टी बॅग्स डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी उपयोगी आहे. यासाठी एका भांड्यात पाणी उकळा आिण त्यात २ टी बॅग्स ठेवा. पाणी गार झाल्यावर टी बॅग्स काढून ३ ते ४ मिनिटांपर्यंत तुमच्या डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांसह हे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

३. बर्फाच्या तुकड्याने शेका
एका सुती कापडात किंवा रुमालात बर्फ ठेवा आिण हलक्या हाताने बर्फाने शेका. जर तुम्ही काही सेकंदापर्यंत बर्फाला डोळ्यांवर ठेवणे सहन करू शकत असाल तर बर्फ डोळ्यांवर ठेवा. यामुळे तुम्हाला २ ते ३ मिनिटांत परिणाम दिसून येईल. याप्रकारेच गार दुधात कापसाचा बोळा बुडवून ५ ते १० मिनिटांपर्यंत डोळ्यांवर ठेवा. यामुळे चेहरा फ्रेश दिसेल आिण डोळ्यांची सूजही उतरून जाईल.

४. गुलाब जल
गुलाब जल तणाव आिण थकलेल्या डोळ्यांसाठी एक नैसर्गिक शांत प्रक्रियेचे काम करतो. याशिवाय याचा वापर डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी होतो आिण त्वचा मुलायम, आकर्षक करते. गुलाब जलच्या दररोजच्या वापरामुळे डोळ्यांचा मऊपणा टिकून राहतो.

५. काकडीचे तुकडे
डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी काकडी चांगली आहे. काकडीच्या तुरट गुणर्धमामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या थकलेल्या मांसपेशींना शांत करते. गार काकडीचे दोन तुकडे घ्या आिण डोळ्यांवर २५ ते ३० मिनिटे ठेवून झोपा. यामुळे देखील फायदा होईल.

जुन्या पद्धतीचा करा वापर
डोळ्यांवर गार पाण्याचा शिपका मारा. यामुळे तुमच्या डोळ्यांचा मऊपणा टिकून राहतो. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो. घरात असलेले गार दूध डोळ्यांची सूज कमी करण्यास उपयोगी आहे. गार दुधात कापसाचा बोळा बुडवून काही वेळ याला डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज तर उतरेल शिवाय तुम्हाला फ्रेशही वाटेल.

बातम्या आणखी आहेत...