आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्नाटा, दुखणे मनात आहे, तर त्यावरील उपायही मनातच असणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जीवनात बरेच काही चुकीचे समज रूढ झाले आहेत, ज्यामुळे मन विनाकारण वारंवार दु:खी हाेत असते. अलीकडच्या काळात आपले शरीर सतत आजारपणाला सामाेरे जात असल्याचे, नातेसंबंध दुरावत असलेले पाहताे तरीही नफ्यात बऱ्यापैकी वाढ हाेत असल्याचे पाहत असताे. हल्ली तर असेच हाेत आहे. आपल्या आसपासदेखील असेच पाहायला मिळते. नैराश्य तर इतके वाढले की, युवावस्थेतच हार्ट अॅटॅक येऊ लागला आहे. आपण दरराेज एेकताे की घटस्फाेट दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आपली मुले अमली पदार्थ, मद्यसेवन, धूम्रपानाकडे का आकर्षित हाेत चालली आहेत? कारण ती आतून दु:खी आहेत. असे सगळे घडत असताना आपण म्हणताे की, प्राॅफिट वाढताे आहे. खरा प्रश्न येथेच सुरू हाेताे. म्हणूनच प्रत्येकाने शांतपणे बसून विचार केला पाहिजे की, मला स्वत:साठी आणि माझ्या कुटुंबासाठी काय केले पाहिजे? मुले आपल्याच विवंचनेत, वेदनेत इतकी गुरफटली आहेत की, आई-वडिलांना थेट मनातलं बाेलण्यास धजावत नाहीत. कारण आपण काही बाेललाे तर विनाकारण रागावले जाऊ याची भीती त्यांना वाटते. मग पर्याय म्हणून काउन्सिलर, सायकॉलाॅजिस्ट बनवले. मुले त्यांच्याकडे जाऊन कौन्सिलिंग करतात. १०-२० वर्षांपूर्वी अशी काही व्यवस्था नव्हती. रागावण्याच्या स्वभावाची ही किंमत म्हणावी. आपलीच मुले आपल्याशी माेकळेपणाने संवाद साधण्याएेवजी एखाद्या अनाेळखी व्यक्तीकडे जातात, आपण कमावलेले पैसे त्यास देऊन अडचणींचे समाधान शाेधतात. तरीही आपण क्षणभर थांबून असा विचार नाही करीत की, खरेच आम्ही याेग्य दिशेने चाललाे आहाेत? माैन मनात दाटले आहे, खरे दुखणे मनात आहे तर त्यावरील उपायही मनात दडलेला असणार हे नक्की. शांती आणि प्रेम हेच खरे भांडवल आहे, त्यानंतर प्रामाणिकपणा. शांती ही सर्वाेपरी आहे आणि प्रामाणिकतेचा क्रमांक त्यानंतर लागताे. पहिले भांडवल आपल्याकडे नसतेच. त्यामुळे दुसऱ्या बाबीला आपण फारसे महत्त्व देत नाहीत. प्रेम, पवित्रता, सुख, शांती, शक्ती, ज्ञान आणि अनंत हे आत्म्याचे सात गुण आहेत. प्रामाणिकपणा तर खूप दूरची गाेष्ट आहे. प्राथमिक रंग असतील तर त्यांची मिसळ करून आणखी वेगळे रंग तयार करता येतात. जर प्राथमिक रंग नसतील तर इतर रंग कसे तयार हाेतील? जेथे शांती नाही, केवळ राग-संताप आहे, फायदा अधिक हवा असेल तर तुम्ही जादा प्रामाणिक असू शकत नाहीत. मग मी सांगेन की, चुकीचा मार्ग अवलंबा, लवकर कामे करा. कारण लवकरात लवकर नफा हवा आहे ना. अनंत नाही तर आम्ही विचार केला ताे अन्य जागी आहे. मार्गात काेणी आला तर मी काहीही करायला तयार असताे. मूल्ये यासाठी कुचकामी ठरत आहेत. कारण आत्म्याचे जे प्राथमिक मूल्य आहे त्याचा वापर आपण करीत नाहीत. मग आता विचार करताे की, मूल्ये कुठूनतरी बाहेरून मिळतील. मला प्रेम, आनंद आणि शांती हवी आहे. तेव्हा परमात्म्याने येऊन सांगितले की... मी शांतस्वरूप आत्मा आहे.

बी.के. शिवानी, ब्रह्माकुमारीज

बातम्या आणखी आहेत...