आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • If The Property Is Passed On To The Child Through A Testament, The Grandchildren Will Not Be Entitled To Inherit It.

कमावलेली संपत्ती मुलाला मृत्युपत्राद्वारे दिली असेल तर नातवांना त्यावर वारसा हक्क सांगता येणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पवन कुमार  

नवी दिल्ली - संपत्तीच्या वाद प्रकरणात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीने स्वत: कमावलेली संपत्ती मृत्युपत्राद्वारे आपल्या अपत्यांना दिली तर पुढील पिढीला त्या संपत्तीवर वडिलोपार्जितचा हक्क सांगता येणार नाही. पिता ही संपत्ती स्वत:ची मुले किंवा त्यांना वाटेल त्यास देऊ शकतो. न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या पीठाने गुजरातच्या गोविंदभाई छोटाभाई पटेल विरुद्ध पटेल रमणभाई माथूरभाई या प्रकरणात हा निर्णय दिला. हा निकाल महत्त्वपूर्ण आहे. कारण आतापर्यंत न्यायिकदृष्ट्या आजोबांकडून वडिलांकडे आलेली संपत्ती पुढील पिढीसाठी वडिलोपार्जित समजली जायची. न्या. गुप्ता म्हणाले की, या प्रकरणात आमच्यासमोर हा प्रश्न होता की, वारस या नात्याने आपल्या पित्याकडून मिळालेली संपत्ती छोटाभाईंची वडिलोपार्जित होती की त्यांनी स्वत: कमावलेली संपत्ती ? आम्हाला याचे उत्तर १९५३ मधील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून मिळाले. 
 

पित्याने अनेक ‌वर्षे सोबत राहणाऱ्यांना भेट दिली होती संपत्ती 
गुजरातच्या पाडरा भागातील आशाभाई पटेल यांनी स्वत: कमावलेली संपत्ती मृत्युपत्राद्वारे मुलगा छोटाभाईला १९५२ मध्ये दिली होती. छोटाभाईचा मुलगा गोविंदभाई व इतर अमेरिकेत राहत होते. छोटाभाईच्या पत्नीचे १९९७ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये आपल्यासोबत राहणाऱ्या रमणभाईंना गिफ्ट डीडच्या रूपात आपली संपत्ती दिली. २००१ मध्ये छोटाभाईंचे निधन झाले. त्यानंतर गोविंदभाई व इतरांनी हे गिफ्ट डीड बनावट असल्याचे सांगत कोर्टात खटला दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...