आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाेपाळ - आगामी पाच वर्षांत राम मंदिराचे निर्माण झाले नाही तर माेदी सरकारला संत समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे, असे कमलनाथ सरकारमध्ये राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या काॅम्प्युटरबाबांनी म्हटले आहे.
मंदिराबाबत केंद्र सरकारला ठाेस निर्णय घ्यावा लागणार आहे, अन्यथा संत समाज त्यांच्याविराेधात जाईल ही गाेष्ट लक्षात घ्यायला हवी. रविवारी वृक्षाराेपण, पर्यावरण संरक्षण या विषयावरील बैठकीसाठी नामदेव दास त्यागी ऊर्फ काॅम्प्युटरबाबा येथे आले हाेते तेव्हा ते पत्रकारांशी बाेलत हाेते. सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, परंतु त्या काळात मंदिराचे काम पूर्ण हाेऊ शकले नाही. आता माेदींना पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता मिळाली आहे. आता राम मंदिर निर्माण व्हायला हवे.
वाळू उत्खननासंबंधी प्रश्नावर ते म्हणाले, शिवराज सरकारच्या काळात नर्मदा नदीच्या रेतीचा माेठा उपसा झाला. ही व्यवस्था बिघडलेली आहे. तिला सुधारण्यासाठी कमलनाथ सरकारने नद्यांतील बेकायदा वाळू उत्खननाला राेखण्याचे ठरवले आहे.
अनुष्ठान देवाने स्वीकारले नाही : दिग्विजय सिंह यांच्यासाठी काॅम्प्युटरबाबांनी निवडणुकीच्या काळात अनुष्ठान केले हाेते. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, दिग्विजय यांच्यासाठी अनुष्ठान करण्यात आले हाेेते हे खरे आहे, परंतु त्यांचा पराभव झाला. कारण हे अनुष्ठान देवाने स्वीकारले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.