आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If The Telecom Company Deducts Additional Services From Mobile Without Your Permission, Company Will Have To Pay Back

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंपनीने तुमच्या परवानगीशिवाय मोबाइलमधून अतिरिक्त सेवांचे पैसे कापल्यास करावे लागतील परत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमितेश कुमार 

रांची - मोबाइल कंपन्यांबद्दल असलेली तुमची मोठी तक्रार दूर होणार आहे.  अॅक्टिव्ह न करता किंवा तुमची परवानगी न घेता तुमच्या मोबाइलवर काही अतिरिक्त सेवा सुरू होत असतात. यामुळे पैसेही कापले जातात. मात्र यातून आता तुमची सुटका होणार आहे. कापलेले पैसे कंपनीला परत करावे लागतील. यासाठी ट्रायने कम्प्लेंट मॅनेजमेंट अॅप आणले आहे. यामुळे तुम्हाला मोबाइलवर सुरू असलेल्या अतिरिक्त सेवांची माहिती मिळेल. आणि तुम्ही पैसे परत करण्याचा दावाही करू शकता. तुमच्या क्रमांकावर तुमची टेलिकॉम ऑपरेटिंग कंपनी, तुम्हाला न विचारता सेवा सुरू करते. यामुळे तुमचे पैसेही कापल्या जातात. असे तुमच्यासोबत बऱ्याच वेळा होते. तक्रार केल्यानंतर, तुमच्या परवानगीनेच सेवा सुरू केल्याचे कंपनीकडून सांगितले जाते. अनेकदा ग्राहक सेवा केंद्राकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. तुम्हीच सेवा सुरू केल्याचे सांगून, पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते. यासाठी ट्रायने नवीन प्रणाली सुरू केली आहे. तुमच्याकडे असलेले पर्याय : अॅप किंवा वेबसाइटवर मोबाइल क्रमांक सांगा, ३० दिवसांत सेवांबद्दल मिळेल माहिती


दूरसंचार नियमन प्राधिकरणाने (ट्राय) TRAI CMS या नावाने अॅप आणि cms.trai.in वेबसाइट सुरू केली आहे. यावर मोबाइल क्रमांक व ऑपरेटरची माहिती दिल्यास ओटीपी मिळेल. हा नोंदवल्यानंतर मागील ३० दिवसांत सुरू झालेल्या सेवांची पूर्ण माहिती मिळेल. तसेच तुमच्याकडून कंपनीने परवानगी घेतलेल्या तारखेविषयी आणि वेळेविषयी माहिती मिळेल. तुम्ही परताव्याचा दावा केल्यानंतर कापली गेलेली रक्कम तुम्हाला  दिसेल. तसेच कंपनीला ही रक्कम परत करावी लागेल.

तंटा निवारण... कंपनी व्हीएएसच्या संमतीची संपूर्ण माहिती देईल. तुम्ही सहमत नसल्यास विवाद पर्याय वर जा. ट्राय तुमच्या तक्रारीवर लक्ष ठेवेल.