आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलाच्या ऑनलाइन दर्शनाचे शुल्क रद्द न केल्यास आंदोलन,संरक्षण कृती समितीचा इशारा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पंढरपूर - विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने ऑनलाइन दर्शन नोंदणीसाठी १०० रुपये तसेच तुळशीपूजेसाठी २१०० रुपये देणगी शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय २ दिवसांत मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीने दिला आहे. प्रसंगी या बेकायदेशीर निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागू, असेही समितीने म्हटले आहे.   


मंदिर संरक्षण कृती समितीचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर म्हणाले,  मागील अनेक महिन्यांपासून आम्ही श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची सुलभ व्यवस्था होण्यासाठी नि:शुल्क टोकन व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करत आहोत.  पंढरपूर मंदिर अधिनियम कायदा १९७३/७४ नुसार, विठ्ठलाच्या दर्शनाला कोणतेही शुल्क आकारता येत नाही.  तरीसुद्धा मंदिर समितीने ऑनलाइन दर्शन नोंदणी पासकरिता १०० व तुळशीपूजेसाठी २१०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. मंदिराचे व्यवस्थापन समिती सदस्य व अधिकाऱ्यांची नियुक्ती ही भाविकांना सेवा सुविधा, सुलभ दर्शन व्यवस्था इत्यादी प्राधान्यक्रमाने करण्यासाठी असतानाही मंदिर प्रशासन आणि सदस्य मंडळी वारंवार सुविधा देण्याच्या नावाखाली उत्पन्न कमावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.   

बातम्या आणखी आहेत...