आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If There Is A Life, There Will Be Struggles Amitabh Bachchan Shared His Father Quotations

आयुष्य आहे तर संघर्ष असणारच : बाबूजींच्या शिकवणीने अमिताभ यांना जगणे शिकवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी वयाची 77 वर्षे पूर्ण करत आहेत. पण यंदा बिग बी त्यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणार नाहीत. आपल्या चाहत्यांकडे ते विनंती करताना म्हटले की, त्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. पुढे ते म्हणाले, "यामध्ये सेलिब्रेशनसारखे काय आहे? हा दिवस नेहमीप्रमाणे अगदी एक सामान्य दिवस आहे. मी आभारी आहे की, आजही मी काम करतोय आणि माझे शरीर माझ्या आत्म्याशी ताळमेळ घालण्यास सक्षम आहे."

बिग बींनी कायम लक्षात ठेवली वडिलांची शिकवण
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बिग बींनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, त्यांचे वडील आणि कवी हरिवंशराय बच्चन त्यांच्या वाढदिवशी त्यांच्यासाठी एक कविता लिहून त्यांना ऐकवत असे. बिग बी म्हणाले, "ही आमच्या कुटुंबाची एक परंपरा होती. पण 1984 साली माझ्यासोबत घडलेल्या अपघातानंतर माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक कविता लिहून ती मला ऐकवली होती. ती माझ्यासाठी एक नवीन आयुष्य मिळवण्यासारखी होती. कविता ऐकवत असताना माझे वडील खूप भावूक झाले होते. त्यावेळी पहिल्यांदाच मी त्यांना एवढे खचलेले पाहिले होते."


संघर्षाच्या काळात मी माझ्या वडिलांच्या शेजारी बसायचो. आमच्यात काहीच संवाद होत नसे, पण त्यांच्याजवळ बसून मला अतिशय समाधान मिळत असे. एक दिवस मी त्यांना म्हणालो, 'बाबूजी, आयुष्यात खूप मोठा संघर्ष आहे. एकामागून एक अडचणी येत आहेत. संघर्षला सीमाच नाही. त्यावर ते म्हणाले होते,  'बेटा, आयुष्य आहे तर संघर्ष असणारच. जोवर आपण आहोत, तोवर संघर्ष असेल आणि तो राहिलच. येथेच एक ब्रह्म वाक्य मला मिळाले."


बिग बी म्हणतात, 'आयुष्य आहे तर संघर्ष आहे, हे माझ्यासाठी एक मार्गदर्शक वाक्य आहे. तेव्हापासूनच मी संघर्ष आणि आयुष्याकडे एका दृष्टीने बघतोय. यामुळेच संघर्षाला मी तोंड देऊ शकतो, हा विश्वास माझ्यात निर्माण झाला. आता संघर्ष आणि आयुष्य मला चांगले वाटते.

संघर्ष, विश्वास आणि प्रेमाविषयी अमिताभ म्हणतात...
संघर्ष काय असतो
?
- आयुष्यात अडचणी येतच राहणार आहेत. प्रत्येक दिवशी आयुष्यात संघर्ष करावा लागतो. जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत संघर्ष असणार आहे. संघर्षासाठी कायम तयार असायला हवे. आता संघर्ष संपला, असे समजणे चुकीचे ठरेल. प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागेल, असे जेव्हा तुम्ही मानसिकरित्या तयार होता, तेव्हाच तुम्ही तुमचे शरीर आणि मन सांभाळू शकता.

विश्वास म्हणजे काय?
- विश्वास अशी एक गोष्ट आहे, ज्यात मी थोडा कमजोर पडतो. कारण मी अतिशय पेसीमिस्टीक आहे. नकारात्मक विचार करतो. हे ठीक होईल आणि हे ठीक होणार नाही, अशाच विचारात मी असतो. असाच विचार मी कायम करत असतो. पण मी प्रयत्नशील आहे, जर व्यक्ती प्रयत्नशील असेल, तर ती इतरांचा विश्वास मिळवू शकते आणि यश मिळवू शकते.

प्रेमचा अर्थ काय?
- प्रेम अतिशय महत्त्वाचे आहे. प्रेम जर नसेल तर कार्यात विघ्न येतात. जर तुमचे लिखाणावर प्रेम नसेल तर तुम्ही पत्रकार किंवा लेखक होऊ शकत नाहीत. जर माझे माझ्या कामावर प्रेम नसेल तर चित्रपट चांगला बनणार नाही. प्रेम हे आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे अंग आहे. 

बातम्या आणखी आहेत...