आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If You Are Looking For A Job, Then Dont Comment On Facebook On Controversial Topics, Companies Do Not Employ Such People

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरी शोधत असल्यास वादग्रस्त मुद्द्यांवर फेसबुकवर टिप्पणी करणे पडेल महागात, अशा लोकांना कंपन्या नोकरी देत नाही

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

वाॅशिंगटन - वादग्रस्त मुद्द्यांवर फेसबुकवर टीकाटिप्पणी करण्याची सवय असल्यास नोकरी मिळताना अडचण येऊ शकते. कारण सोशल मीडियावर मनमोकळपणाने आपली मते मांडणाऱ्या उमेदवारांना नोकरी देण्यास कंपन्या टाळाटाळ करतात,असे निरीक्षण अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्य विद्यापीठाच्या संशोधकांनी  नोंदवले आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सिलेक्शन अँड असेसमेंटमध्ये यासंदर्भात एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार मद्य अथवा मादक पदार्थ सेवन संबंधित पोस्ट करणाऱ्या उमेदवारांच्या निवडीबाबतही कंपन्या अनुत्सुक असतात. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमंेटचे सहायक प्राध्यापक मायकेल ट्यू यांच्या मते, सोशल मीडियावर आलेल्या नकारात्मक कंटेंटला कंपन्या कितपत महत्त्व देतात याबद्दल ठामपणे सांगता येणार नाही, मात्र महत्त्व देतात हे निश्चित. नियुक्तीच्या प्रक्रियेवर  परिणाम करणाऱ्या तीन नकारात्मक गोष्टींचा शोधनिबंधकर्त्यांनी अभ्यास केला. यामध्ये स्वयंकेंद्रीपणा, स्वच्छंदता आणि मद्य, मादक पदार्थांचे सेवन. त्यांनी विविध कंपन्यांमध्ये निवड करणाऱ्या ४३६ अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेचा अभ्यास केला. त्यांना एका काल्पनिक उमेदवाराचा अर्ज  दिला. त्यामध्ये सर्व प्रश्नांची अगदी चपखल, समर्पक उत्तरे दिली होती. त्यासोबतच उमेदवाराच्या फेसबुक प्रोफाइलची तपासणी करून नोकरी मिळण्याची शक्यता किती हेसुद्धा नमूद करण्यास सांगितले होते. प्रोफाइल वाचल्यानंतर आपल्या कंपनीसाठी योग्य उमेदवारांचे अधिकाऱ्यांनी मूल्यांकन केले. स्वयंकेंद्रितपणा हा नोकरी मिळण्यासाठी नकारात्मक गुण असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. सोशल मीडिया साइट्समुळे आत्मकेंद्रीपणा वाढतो असे ट्यू म्हणतात.  कंपनी अथवा इतर सहकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी त्याग करण्याची आत्मकेंद्री व्यक्तीची फारशी तयारी नसते. सोशल नेटवर्किंग साइट्सवर वादग्रस्त मुद्द्यांवर मनमोकळेपणाने विचार मांडण्याची संधी  असते, मात्र जे लोक विघातक वृत्तीच्या  पोस्ट टाकतात त्यांच्याकडे भांडकुदळ अाणि अल्पकाळचे सहकारी म्हणून पाहिले जाते. उमेदवारांच्या योग्यतेपेक्षा अशा पोस्ट अधिक विपरीत परिणाम करतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.