आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरोदर असाल तर रोज खा बीट, होतील हे फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीट अनेक पोषक घटकांनी युक्त असून रोजच्या आहारात बीटचा वार केला तर त्याचे अनेक फायदे होतात. बीटमध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटेशिअम, फॉस्फरस, व्हिटॉमिन बी १, बी १ आणि सी आयर्न आणि फॉलिक अॅसिड असते. गरोदर महिलेने हे खाल्ले तर खूपच उपयाेगी ठरते.

रक्तदाब, डायबिटीज नियंत्रणात राहते
बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहो. बीटमध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या नायट्रेटमुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसेच, यामुळे डायबिटीजही नियंत्रणात राहते. बिटचा रस पिण्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते आणि चांगले वाढते. शिवाय बिटमुळे हृदयाच्या मांसपेशीही मजबूत होतात.

संधीवात दूर हाेतो
गर्भधारणेदरम्यान, हात, पाय तसेच चेहरा, स्तन आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज येणे सामान्य आहे. अशावेळी दररोज बिट घेतल्यास सांध्यातील वेदना आणि सूज टाळता येऊ शकते. बिटमध्ये बीटेन नावाचा एक अँटिइन्फ्लेमेटरी एजंट असतो, जो शरीरात होणारी जळजळ आणि सूज दूर करण्यास मदत करतो. तुम्हाला बिट खाणे आवडत नसेल तर रस बनवून किंवा सलाडमध्ये मिसळून खाऊ शकता.

अॅनिमियापासून बचाव करते
बिटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत होते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान अॅनिमिया होत नाही. गर्भधारणेदरम्यान जास्त रक्ताची गरज असते. अशा काळात अॅनिमिया झाला तर आई आणि बाळ दोघांनाही धोका असतो. अॅनिमिया झाला तर बाळाचे वजन कमी होण्याची किंवा प्रीमॅच्युअर जन्म होण्याचा धोका असतो. म्हणून, गरोदरपणात बिट खाणे फायद्याचे ठरते.

बातम्या आणखी आहेत...