आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • If You Cannot Provide Clean Air In Delhi, Bring 15 Bags Of Explosives And Kill Everyone : Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत स्वच्छ हवा देऊ शकत नसाल तर 15 बॅग स्फोटके आणा, सर्वांना मारून टाका : कोर्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावरून दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारला कोर्टाने फटकारले. तसेच केंद्र सरकारलाही सुनावले. न्या. अरुण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांचे पीठ म्हणाले, 'लोकांना गॅस चेंबरमध्ये राहण्यास भाग का पाडले जात आहे ? त्यापेक्षा त्यांना सर्वांना एकदाचे मारून का टाकत नाहीत? स्वच्छ हवा देऊ शकत नसाल तर १५ बॅग भरून स्फोटके आणा आणि सर्वांना एकाच वेळी मारून टाका.'

मुख्य सचिवांना सुनावले - तुम्हाला पदावर राहण्याचा हक्क नाही

तुमची लाचारी कॅन्सर वाढवत आहे

'तुम्ही (मुख्य सचिव) पिकांचे काड जाळण्याचा तपास का करू शकत नाही? ही आपली लाचारी नव्हे का ? याचा अर्थ असा तर नव्हे ना की, दिल्लीत लोक मरावेत आणि कर्करोगी व्हावेत.'

दिल्लीत नरकापेक्षा वाईट स्थिती

दिल्ली नरकापेक्षा वाईट झाली आहे. भारतात जीवन एवढे स्वस्त नाही. आता तुम्हाला (मुख्य सचिव) याची किंमत चुकवावी लागेल. तुम्हाला पदावर राहण्याचा हक्क नाही.

जग आपल्यावर हसते आहे

जगातील लोक आपल्या देशावर हसताहेत. आपण काड जाळणे रोखू शकत नाही. तुम्ही सर्वजण (सरकार) आरोप-प्रत्यारोपांचा खेळ खेळता हे आम्हाला जाणवले आहे.

न्या. अरुण मिश्रा आणि न्या. दीपक गुप्ता यांनी हे भाष्य केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...