आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंमत असेल तर राणांनी खुली चर्चा करावी, ..अन्यथा घरासमोर बेशरमाचे झाड लावणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कल्याणनगरमधील रस्त्याच्या भूमीपूजनाच्या वादाचे राजकीय पडसाद शहरात उमटत अाहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांना 'बालकमंत्री' संबोधणाऱ्या आ. रवी राणा यांचा भाजपचे माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी खरपूस समाचार घेतला. कल्याणनगर रस्त्याच्या विकासाकरिता निधी प्राप्त केल्याचा कागद दाखवत 'खुली चर्चा करा अन्यथा घरासमोर बेशरमचे झाड लावू', असा इशारा भारतीय यांनी अा. राणा यांना बुधवारी पत्रपरिषदेत दिले. दुसरीकडे विजय मिल प्रकरणात युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी आ. राणांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, प्रारूप विकास आराखड्यात गजानन महाराज शिक्षण संस्थेला आरक्षण प्रस्तावित असल्याचे बिंग फुटल्याने राणांसह त्यांच्या 'युवा स्वाभिमान'ची चांगलीच कोंडी झाली. या शिक्षण संस्थेत आ. राणांचे अख्खे कुटुंबीयच विश्वस्त असल्याचे पुरावेच ' युवा स्वाभिमान' च्या कार्यकर्त्यांकडून पत्रपरिषदेत िदल्याने भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या आरोपाला बळ मिळाल्याची चर्चा आहे.

 

शिवराय कुळकर्णी : विकास प्रारुप आराखड्यात राणांच्या संस्थेसाठी आरक्षण अखेर मिळालेच कसे?
आमदार रवी राणा यांच्या गजानन महाराज शिक्षण संस्थेने मागणी केलेली हीच ती बडनेरा येथील जागा.बडनेरा विजय मिलची कोट्यवधी रुपये किंमतीची जागा बळकावण्यासाठी आमदार रवी राणा यांचे कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे महानगराच्या नव्या विकास प्रारूप आराखड्यात या जागेचे आरक्षण राणांच्या संस्थेच्या नावाने प्रस्ताविक केल्याने दिसून येत आहे. जागा आरक्षित करून घेण्यासाठी आमदार राणा यांच्याशी साटेलोटे असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. महानगराच्या नव्या विकास आराखड्याचे प्रारूप मनपाच्या सभेत मंंजूूर करण्यात आले. बडनेरा मतदार संघात येणाऱ्या अनेक जागांवरचे आरक्षण संशयास्पद असल्याचे चित्र काल प्रारूप दाखवता क्षणीच निदर्शनास आले.


विजय मिलची जागा गोरगरीब, शोषित, पिडीत व वंचित जनतेच्या हक्काची आहे. वर्षानुवर्षे ही जागा विजय मिलचे मजूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांने प्रेरीत गोरगरीब जनतेची आहे. या जनतेला हक्काची घरे देण्यासाठी यावर पूर्णपणे आरक्षण देण्याऐवजी आमदार रवी राणा यांच्या गजानन शिक्षण संस्थेच्या नावे आरक्षण ठेवणे हा गरीब जनतेचा अपमान आहे. 

 

विजय मिलच्या जागेतील एकही इंच जागेचे आरक्षण राणा यांच्या संस्थेसाठी ठेवण्याचे काहीच प्रयोजन नाही. मात्र, आमदारकीच्या दबावात नियमबाह्य पद्धतीने राणांच्या संस्थेसाठी आरक्षण ठेवले असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे कुळकर्णी यांचे म्हणणे आहे. शहराचा विकास आराखडा बनवताना एखाद्या संस्थेच्या नावे आरक्षण ठेवणे देखील आक्षेपार्ह व नियमबाह्य आहे. प्रारूपामध्ये राणांच्या संस्थेच्या नावे आरक्षण ठेवले जाऊ शकते तर समाजात अत्यंत प्रामाणिकपणे निस्वार्थ काम करणाऱ्या संस्थांना देखील हाच नियम लावला गेला पाहिजे. विजय मिल चाळीत राहणारे लोक आणि बडनेऱ्यात स्वतःचा हक्काच्या घरासाठी तडफडत असलेल्या गोरगरीब लोकांसाठी आरक्षण ठेवण्यात यावे. राणांसारख्या धनदांडग्या नेत्याने स्वतःच्या संस्थेसाठी एखादी खासगी जमीन विकत घ्यावी. शासकीय जमिनीवर डल्ला मारू नये. विजय मिलच्या जागेवर नियमबाह्य आरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील शिवराय कुळकर्णी यांनी केली आहेराणासह कुटुंबातील सदस्य गजानन महाराज शिक्षण संस्थेत सदस्य असल्याचा धर्मदाय आयुक्तचा चेंजिंग रिपोर्ट

 

तुषार भारतीय : कागदाचा नेमका अर्थ न कळणारे जनतेची दिशाभूल करणारे आमदार राणाच बालक
विकास निधी मंजूर केल्याचा कागद दाखवत खुली चर्चा करण्याचे आ राणा यांना पत्र परिषदेत आव्हान देताना भाजपचे तुषार भारतीय.शहरातील कल्याणनगर ते यशोदा नगर,

पार्वतीनगरातील सिमेंट रस्ता आणि बडनेरा जुनीवस्ती बारीपुरा येथील बगिचा निर्माण करण्याकरिता राज्य सरकारकडून ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. नगरविकास विभागाचे अवर सचिवांच्या ७ मार्च २०१८ च्या पत्रात नावाने निधी दिला जात असल्याचा स्पष्ट उल्लेख अाहे. मंजूर करुन न आणता विकास कामांचे श्रेय लाटण्याची सवय झालेल्या आमदार रवी राणांनी भूमीपूजन करताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा बालकमंत्री असा उल्लेख करीत शहरातील राजकारण गढूळ करीत आहे. कागदाचा अर्थ कळत नसल्याने आमदार रवी राणा हेच बालक असल्याचे वक्तव्य माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी केले. कल्याण नगर, पार्वती नगर, बडनेरा येथील बगिच्याचे काम मंजूर केल्याचा कागद घेऊन रविवार २५ नोव्हेंबरला खुली चर्चा करावी, असे आव्हान भारतीय यांनी आमदार राणांना दिले.

 

खुली चर्चा केली नाही, तर सोमवार २६ नोव्हेंबरला आमदार राणांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आमदार राणांनी राज्य सरकारला ३९ विकास कामांची यादी दिली होती, सरकारने १९ कामांना मंजुरी दिली. मात्र, या १९ कामांमध्ये या कल्याण नगरचा समावेश नसल्याचे भारतीय म्हणाले. पत्रकार परिषदेला उपमहापौर संध्या टिकले, सभापती पद््मजा कौंडण्य, सभापती सुरेखा लुंगारे, नगरसेवक चेतन गावंडे, अजय गोंडाणे, वंदना हरणे, लता देशमुख, सविता भागवत, भारती चिखलकर उपस्थित होते.

 

विजय मिल जमिन प्रकरणात आरोप फेटाळणाऱ्या आमदार रवी राणांच्या' युवा स्वाभिमान'ची कोंडीआमदार रवी राणा यांच्याकडून विजय मिलची जमीन बळकावली जात नसल्याचे स्पष्टीकरण देताना 'युवा स्वाभिमान'चे कार्यकर्ते.


विजय मिल जमीन प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यावर होत असलेले आरोप परतवून लावण्याकरिता युवा स्वाभिमानच्या वतीने पत्रपरिषद घेण्यात आली. भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी लावलेल्या अारोपांमध्ये तथ्य नसल्याचे कार्यकर्ते सांगत होते. मात्र, विजय मिलच्या जागेवर गत नऊ वर्षांपासून आमदार राणा यांना उद्योग उभारण्यास अपयश का आले. या प्रश्नाने युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली. औद्योगिक अारक्षित जमिनीचा विषय बंद करीत श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांना पुढे करण्यात आले.


शैक्षणिक कार्याकरिता पूर्वी कला महाविद्यालय असलेली जागेची मागणी जुनी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा देण्यात आलेल्या चेजिंग रिपोर्टमध्ये श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचे सर्वाधिक विश्वस्त हे आमदार रवी राणा यांच्यासह कुटुंबीय असल्याची बाब उघड झाले. ११ पैकी सहा सदस्य राणा कुटंुबीय असल्याने आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांनीच उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले. यामुळे आमदार रवी राणा यांच्याकडून शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली विजय मिलची जमीन लाटत असल्याच्या भाजपच्या आरोपाला बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या वेळी नारायणराव राणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे, सिद्धार्थ बनसोड, अजय जयस्वाल, विलास वाडेकर, सिद्धार्थ बोरकर

बातम्या आणखी आहेत...