आरोग्य / या दिवसांत हातपायाला सूज येत असेल तर करा हे उपाय

थंडीच्या दिवसांत बऱ्याचदा हातपाय गारव्यामुळे आखडतात.

दिव्य मराठी वेब टीम

Jan 12,2020 12:15:00 AM IST

थंडीच्या दिवसांत बऱ्याचदा हातपाय गारव्यांमुळे आखडतात. ज्यामुळे हात आणि पायाला सूज येते. थंडीत हातापायाला येणारी सूज आणि खाज यामुळे हैराण असाल तर यामागील कारणे आणि यावरील उपाय जाणून घ्या.


अतिथंड वातावरणात राहिल्यामुळे रक्त गोठत असते. कारण हिवाळ्यात रक्तप्रवाह हळू होतो. अशावेळी हात आणि पाय बराच काळ थंड पडल्यास ब्लड सर्क्युलेशन कमी होते. ज्यामुळे हातापायांना सूज येते आणि ते लाल दिसू लागतात, पण उबदारपणा मिळाल्यास ब्लड सर्क्युलेशन हळूहळू नॉर्मल होते.


बटाट्याचा रस : एक बटाटा घ्या आणि मीठ लावून ज्या ठिकाणी सूज आली तेथेे लावा. ज्यामुळे खाज आणि सूजही कमी होते.


मोहरीचे तेल : रात्री झोपताना पहिल्यांदा गरम मोहरीच्या तेलात सैंधव मीठ मिक्स करून ते हलक्या हातांनी सूज आलेल्या ठिकाणी हातापायांना आणि बोटांना लावा व मोजे घालून झोपा. असे आठवड्यातून 5-6 दिवस केल्यास लगेच आराम मिळतो.


लिंबाचा रस : लिंबाचा रस हात आणि पायाला लावल्यास सूज खूप प्रमाणात कमी होते. त्यामुळे एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि रात्री झोपण्याआधी बोटांना लावा. मग कव्हर करून झोपून जा. यामुळे काही दिवसांतच सूज कमी होईल.


हळदीने दूर करा सूज : हळदीत अँटिबॉयोटिक आणि अँटिसेप्टिक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच हळदीमध्ये उष्णताही असते. त्यामुळे हिवाळ्यात उबदार वाटते. अशावेळी जर हळदीची पेस्ट बनवून हात आणि पायाला झोपतेवेळी लावल्यास वेदना आणि खाजेपासून सुटका होते. हा उपाय 3-4 दिवस केल्यास लगेच फरक जाणवेल.


कांद्याचा रस : हळदीप्रमाणेच कांद्यातही अँटिबॉयोटिक आणि अँटिसेप्टिक गुण आढळतात. ज्यामुळे हात आणि पायाच्या बोटांची सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कांद्याचा रस काढा आणि झोपताना सूज आलेल्या जागेवर पूर्ण रात्र लावून तसेच राहू द्या.


मटारनेही कमी होईल सूज : हातपायांची सूज कमी करण्यासाठी या मटारही फायदेशीर असतात. त्यामुळे हिरवे मटार चांगले उकळून घ्या आणि त्या पाण्याने हातापायाला शेक द्या. रात्री झोपताना मोजे घालून झोपा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा नक्की करा.

X
COMMENT