Home | Jeevan Mantra | Life Management | Rishte | If you love your partner more than children, then it will be a happy family

मुलांपेक्षा जास्त तुमच्या जोडीदारावर प्रेम केल्यास कुटुंब राहील अधिक सुखी

बेलिंडा लुस्कॉम्ब | Update - May 12, 2019, 10:33 AM IST

संशाेधनानुसार भांडणारे आई-वडील मुलांच्या शिक्षणात कमकुवत

  • If you love your partner more than children, then it will be a happy family

    आई-वडील आपल्या मुलांच्या सुविधेसाठी कुठलेही काम करतात. पण ते कदाचित एकमेकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकत नाही. निश्चितच मुलांच्या गरजांकडे आधी लक्ष दिले पाहिजे. नवरा अथवा बायकोला मुलांना खाऊ घालणे, दूध पाजणे, कपडे परिधान करणे या सर्व गोष्टी कराव्या लागतात. मुलांशी प्रेम करणे हे शाळेत जाण्यासारखे आहे. कारण त्यांच्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही.


    तरीही प्रश्न उपस्थित होतो, आम्ही जोडीदाराकडे अधिक लक्ष का देऊ नये? कमीत कमी आम्ही मुलांसाठी असे केले पाहिजे. संशोधनानुसार कळते की, ज्या मुलांचे आई-वडील एकमेकांशी अधिक प्रेम करतात ते मुलांना अधिक सुरक्षित व आनंदी अनुभव करतात. त्यांचे जीवन प्रेमविहीन परिवारातील मुलांपेक्षा अधिक चांगले असते. जोडप्यामधील तणावाचा परिणाम म्हणून आई-वडिलांचा मुलांशी नीटसा संवाद होत नाही. एका अन्य संशोधनातून समोर आले की, ज्या मुलांचे आई-वडील नेहमी भांडण करतात. ती मुलं शाळेमध्ये कमकुवत असतात.


    २०१४मध्ये ब्रिटनच्या ४० हजार परिवारांच्या सर्व्हेमधून समजले की, आईचा नवऱ्याप्रती असलेल्या मधुर संबंधांमुळे मुले अधिक आनंदी राहतात. मुलांवर आई-वडिलांच्या घटस्फोटाचा खूपच वाईट परिणाम होतो. २०१०मध्ये प्यू संशोधकाने युवांना विचारले की, सुखी जीवनासाठी मुले अथवा चांगले वैवाहिक संबंध काय खूप महत्त्वपूर्ण असतील तर बहुतांशी लोकांनी मुलांना प्राधान्य दिले. मुलांचे सर्व हट्ट पुरवणे योग्य नाही. मुलं मोठे झाल्यानंतर तुमचे लाड अथवा स्वप्नाबाबत ते केंद्र ठरू पाहत नाही.


    मुलांच्या पालन-पोषणात पूर्णत: स्वत:ला झोकून देणाऱ्या आई-काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ५० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकांत घटस्फोटाची संख्या दुप्पट होण्याचे हेही कारण आहे. २५ वर्षांत ६५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकांमध्ये ही संख्या तिप्पट आहे. कार्नेल युनिव्हर्सिटीमध्ये वृद्धावस्था विज्ञानाचे तज्ज्ञ कार्ल पिलेमर यांनी त्यांचे पुस्तक ३० लेसंस फॉर लविंगसाठी ७०० जोडप्यांच्या मुलाखती दिल्या होत्या. यातील काही लोकांच्याच लक्षात होते की, त्यांनी त्यांच्या पाटर्नरसोबत केव्हा एकांतपणे वेळा घालवला होता. याबाबत अनेक अभ्यास करण्यात अाले.

Trending