आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या आवडीच्या कामामध्ये करिअर केले तर कंटाळा येणार नाही, उलट जास्त मेहनत कराल- टिम कुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू ऑरलियंस(पेरिस)- अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले की, तुम्ही जे पण आपल्या आवडीचे काम करता, त्यालाच आपले करिअर बनवा, या कामात तुम्हाला कधीच कंटाळ येणार नाही. कुक न्यू ऑरलियंसच्या टुलाने यूनिव्हर्सिटीच्या ग्रॅजुएशन सेरेमनी दरम्यान विद्यार्थांना संबोधित करत होते. तर ईकॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी अलीबाबाचे फाउंडर जॅक मा यांनी पॅरिसमध्ये पार पडलेल्या व्हीवा टेक्नोलॉजी कॉन्फ्रेंसमध्ये आंत्रप्रेन्योर नेहमी मिळणाऱ्या नकारापासून सुटकारा कसा करावा याबद्दल सांगितले आहे. जाणून घ्या या दोन दिग्गजांची मते...


प्रयत्नापेक्षा सुंदस दुसरी अशी कोणतीच गोष्ट नाहीये, याला घाबरण्याचे काही कारण नाहीये; मीपण रोज उठून असेच करतो- टिम कुक
 
तुम्हाला जे काम आवडते, त्यालाच आपले करिअर बनवा, त्यानंतर कामात कंटाळा वाटणार नाही. अशी म्हण आहे की, 'तुम्हाला जे आवडते ते काम केले, तर आयुष्यात काम करण्याची गरज भासत नाही.' 'मी अॅपलमध्ये हेच शिकलो आहे, जर तुम्ही आवडीचे काम केले तर कंटाळा येत नाही, कारण आवडीचे काम मिळाले तर, तर तुम्ही त्याला पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावता. त्यावेळेस तुमच्या डोक्यात कंटाळा किंवा थकवा अशा भावना येणार नाहीत. तुम्ही विचारदेखील केला नसेल तितकी उर्जा तुम्ही आवडीच्या कामात लावाल. प्रयत्न करत राहा, प्रयत्नासारखी दुसरी सुंदर गोष्य कोणतीच नाहीये.' 


नकारामध्ये संधी शोधा: मी असेच केले आहे, यश नक्की मिळेल- जॅक मा 
जेव्हा तुम्ही शुन्यातून सुरुवात करता, तेव्हा प्रत्येक आंत्रप्रेन्योरला नकाराचा सामना करावाच लागतो. पण ते  याला विसरून पुढे जातात. नकारात्मक प्रतिक्रीयांना बाजुला करून पुढे जाणे शिका. एक आंत्रप्रेन्योर म्हणून आव्हानांना सामोरे जाण्याची हिम्मत मिळेल. अनेकवेळा नकार ऐकण्यास मिळतो. या नकारामध्ये संधी शोधा. जर मी माझ्या आयुष्यात सगळं कमवलं तर इतर कोणीही करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...