EFP / सलग 3 वर्ष उपयोग न केल्यास बंद होऊ शकते EPF खाते, पैसे काढण्यास होऊ शकते अडचण

EPF खात्याशी काही निगडीत या विशेष बाबी लक्षात असू द्या 
 

दिव्य मराठी वेब

Aug 18,2019 12:23:00 PM IST

युटिलिटी डेस्क - एम्पलॉइज प्रोव्हिडेंट फंड (EPF) खाताच्या सलग तीन वर्ष उपयोग न झाल्यास हे खाते आपोआप बंद होऊ शकते. यामुळे यातील जमा असलेला पैस अडकण्याची शक्यता आहे. आज आम्ही तुम्हाला याच्याशी संबंधित माहिती देत आहोत.


ईपीएफशी निगडीत काही विशेष बाबी


केव्हा बंद होते ईपीएफ खाते?
> ज्या खात्यांमध्ये 36 महिन्यांपेक्षा अधिक काळात रक्कम जमा होत नाही त्यांना निष्क्रिय खात्यांच्या श्रेणीत टाकण्यात येते. पण निष्क्रिय खात्यांवरही व्याज मिळतो.

> खाते निष्क्रिय झाल्यानंतर पैसे काढणे अडचणीचे होऊ शकतो. बँकेच्या मदतीने केवायसीद्वारे तुम्ही पैसे काढू शकता.


कोण करणार प्रमाणित
> निष्क्रिय पीएफ खात्यांसंबधी क्लेम करण्यासाठी कर्मचारीचे नियोक्तानी त्या क्लेमला प्रमाणित करणे आवश्यक असते.
> ज्या कर्मचाऱ्यांची कंपनी बंद झाली आहे आणि क्लेम प्रमाणित करण्यासाठी कोणीच नाही तर बँक केवायसी दस्तऐवजांच्या आधारावर क्लेम प्रमाणित करतील.


या कागदपत्रांची असते गरज
> केवायसी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, राशन कार्ड, ईएसआय ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि आधार कार्डचा समावेश आहे.

> केवायसीनंतर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा अन्य अधिकारी रकमेनुसार खात्यातून पैसे काढणे किंवा खाते हस्तांतरणाला मंजूर करू शकतील.

यांच्या मंजुरीने मिळेल रक्कम

50 हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम सहाय्यक भविष्य निर्वह निधी आयुक्तांच्या मंजूरीनंतरच काढली किंवा हस्तांतरीत केली जाऊ शकते. अशाप्रकारे 25 हजारपेक्षा जास्त आणि 50 हजारपेक्षा कमी रक्कम असल्यास अकाउंट ऑफिसर फंड ट्रान्सफर किंवी विदड्रॉल करण्यास मंजूर देतील. जर रक्कम 25 हजारपेक्षा कमी आहे तर यावर डीलिंग असिस्टंट मंजुरी देऊ शकतो.

X
COMMENT