आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जास्त हाॅर्न वाजवाल तर सिग्नलवर अडकाल

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ध्वनी प्रदूषणाला चाप लावण्यासाठी मुंबई वाहतूक पाेलिसांनी लढवली शक्कल
  • मुंबईतल्या पाच ट्रॅफिक सिग्नलवर या अनाेख्या प्रणालीची अंमलबजावणी

मुंबई - मुंबईतील वाहतुक काेंडाचा प्रश्न दिवसेंदिवस गहन हाेत असताना आता त्यात ध्वनी प्रदुषणाची भर पडली आहे. सिग्नलवर थांबल्यानंतर विनाकारण हाॅर्न वाजवून चालकांनी लाेकांना त्रास देऊ नये तसेच ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी मुंबईच्या वाहतूक पाेलिसांनी अफलातून शक्कल लढवली आहे. त्यानुसार आता वाहन चालक जितक्यावेळा हाॅर्न वाजवतील तितका वेळ त्यांना सिग्नलवरच थांबून रहावे लागेल.
ट्रॅफिकमध्ये थांबलो असताना गाडीचा हॉर्न वाजवणे आपल्याला नवे नाही. अनेकदा गरज नसतानाही लोक हॉर्न वाजवत राहतात. यातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे मात्र सगळेच सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. यावर उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी नामी युक्ती लढवली आहे.  त्यासाठी मुंबईतल्या पाच ट्रॅफिक सिग्नलवर डेसिबल मीटर लावण्यात आले असून ते ट्रॅफिक सिग्नलला जाेडण्यात आले आहेत. 
पाेलिसांनी याचा एक व्हिडीआे देखील ट्वीटरवर पाेस्ट केला आहे. मुंबई पाेलिसांची ही कल्पना बंगळुरू शहर पाेलिसचे आयुक्त भास्कर राव यांना खूप आवडली आहे. ते म्हणाले, ही कल्पना खूप चांगली आहे. आम्ही पण त्याची अंमबजावणी करू.

 

आवाज ८५ डेसिबलच्या वर गेला तर वाहन पुढे जाऊच नाही शकणार


डेसिबल मीटरने ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची नोंद केली तर सिग्नलमधील टायमर रिसेट हाेईल. त्यामुळे लाेक  पुन्हा लाल सिग्नल लागेल व पुन्हा हिरवा सिग्नल हाेण्याची वाट बघावी लागेल. त्यामुळे लाेक जितक्यावेळा हाॅर्न वाजवतील तितक्यावेळ त्यांना जास्त प्रतीक्षा करावी लागेल अशा प्रकारे ही प्रणाली काम करते. ही युक्ती यशस्वी झाल्यास मुंबईतील ध्वनी प्रदुषण कमी हाेण्यास मदत हाेऊ शकेल व कदाचित अन्य शहरातही त्याची पुनरावृत्ती हाेऊ शकते.मागील वर्षात मुंबईत २.८७ लाख वाहनांची भर; एकूण वाहने ३६.४ लाख


मुंबईत वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. मागील एका वर्षात मुंबईत २.८७ लाख वाहने वाढली असल्याचे  मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने करण्यात आलेल्या पर्यावरण स्थिती अहवालातून(ESR) ही माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या वर्षी वाढलेल्या वाहनांमध्ये दुचाकी , कार , रिक्षा आणि टॅक्सींचाही समावेश आहे . मार्च २०१९ पर्यंत मुंबईतील वाहनांची संख्या एकूण ३६.४ लाख इतकी असल्याचे म्हटले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...