आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 तासांहून जास्त वेळ TV पाहिल्यास लवकर मृत्यूू: ब्रिटनमध्ये 3 लाख 29 हजार लोकांवर केले संशोधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - तासनतास टीव्हीच्या समोर बसल्याने लोकांना धूम्रपान, मद्यपान आणि चुकीच्या खाण्यापिण्याची सवय लागत आहे. याकडे दुर्लक्ष केल्याने हृदयरोगाचा धोका वाढून ही सवय जिवावरही बेतू शकते, असा निष्कर्ष ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून समोर आला. तीन लाख २९ हजार लोकांच्या चार तासांपेक्षा अधिक वेळ टीव्ही पाहण्याच्या सवयीवर हे संशोधन केले गेले.  


संशोधनातील निष्कर्षांनुसार, अधिक वेळ टीव्ही पाहिल्यामुळे लोकांमध्ये स्थूलता आणि चिडचिडेपणा वाढत चालला आहे. ४० ते ६९ वर्षे वयोगटातील लोकांवर हे संशोधन केले गेले. बहुतांशी लोक हे गरीब कुटुंबातील आहेत. संशोधनात चार तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहणारे आणि यापेक्षा कमी वेळ टीव्ही पाहणाऱ्या लोकांच्या सवयीवर लक्ष केंद्रित केले गेले. दोन तास दोन मिनिटे टीव्हीसमोर बसणारे लोक अधिक निरोगी आणि दोन तास नऊ मिनिटे टीव्ही पाहणाऱ्या लोकांचे आरोग्य तुलनेत कमी निरोगी होते.

 

दररोज ७ तासांपेक्षा कमी आणि ९ तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहणाऱ्या अनेक लोकांचे शास्त्रज्ञांकडून परीक्षणही करण्यात आले. यात निघालेल्या धक्कादायक निष्कर्षांनुसार, असे लोक एकतर खूप जास्त किंवा खूप कमी झोप घेतात. या कारणामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. टीव्ही अधिक पाहिल्याने धूम्रपान, मद्यपान आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी लागत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी लोकांनी व्यायाम करायला हवा, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला.  

 
जास्त वेळ टीव्ही पाहणाऱ्या महिला, पुरुषांमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण अधिक आढळले. आठवड्यात ५ तास किंवा त्यापेक्षा कमी टीव्ही पाहणाऱ्या लोकांच्या तुलनेत २१ तास किंवा त्यापेक्षा जास्त टीव्ही पाहणाऱ्या लोकांमध्ये स्थूलत्व दुप्पट आढळले. टीव्ही पाहण्याचा वेळ आणि झोपेची वेळ जीवनशैलीसाठी सर्वात धोकादायक असल्याचा निष्कर्षही या संशोधनातून काढण्यात आला.   

 

पायातील नसांमध्ये रक्त गोठून मृत्यूचा धोका वाढतो  
सतत अडीच तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने ‘पल्मोनरी एम्बोलिस्म’चा धोका असतो. अशा स्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या नसांमध्ये रक्त गोठले जाते व फुप्फुसापर्यंत रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. यामुळे मृत्यूचा धोका ओढवण्याची शक्यता असते. चुकीच्या सवयींमुळे स्थूलत्व, डोळ्यांना त्रास, चिडचिडेपणा आणि हृदयाशी संबंधित आजार वेगाने होतात, असे संशोधनकर्त्यांचे मत आहे. संशोधन टीममधील सदस्य मार्टिनेज गोंजालेस यांच्या मते, लोकांनी शारीरिक हालचाली वाढवण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे. दररोज टीव्ही पाहण्याची वेळ एक ते दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवायला हवी.

बातम्या आणखी आहेत...