What's App / व्हॉट्सअॅपवर शिवीगाळ करताना सावधान : शिवीगाळ करणाऱ्यांचे अकाऊंट व्हॉट्सअॅप करणार डिलीट

ऑटोमेटेड मेसेजिंग थांबवू तसेच दरमहा २० लाख अकाउंटवर बंदी आणू -  व्हॉट्सअॅप 

वृत्तसंस्था

Jul 15,2019 10:40:00 AM IST

सॅन फ्रान्सिस्को - ग्लोबल मेसेजिंग प्लॅटफार्म व्हॉट्सअॅपने आता मशीन लर्निंग तंत्राने चिथावणीखोर संदेश व अपशब्द वापरणाऱ्यांना ओळखून काढणार आहे. सातत्याने सेवा व अटींचे उल्लंघन करणाऱ्याचे अकाउंट त्वरित डिलीट करणार आहे. हे तंत्र डिसेंबर २०१९ पासून अमलात येईल. कंपनीने या वर्षांच्या सुरुवातीलाच नियमाचे उल्लंघन करणाऱ्या युजर्सवर कारवाई करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. जगभरात व्हॉट्सअॅपचे १५० कोटी युजर्स आहेत. फेसबुकचे स्वामित्व असलेल्या व्हॉट्सअॅपने शनिवारी सांगितले, आम्ही हा प्लॅटफार्म वैयक्तिक, खासगी संदेश पाठवण्यासाठी तयार केले. त्याचा गैरवापर करण्यासाठी नाही. ऑटोमेटेड मेसेजिंग थांबवू तसेच दरमहा २० लाख अकाउंटवर बंदी आणू.

X
COMMENT