आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पॅम कॉल्समुळे त्रस्त आहात... तर हे उपाय करू शकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक भारतीय आपल्या मोबाइलवर महिनाभरात किमान 25 स्पॅम कॉल रिसीव्ह करतो, असा दावा ट्रूकॉलरच्या अलीकडील अहवालात करण्यात आला आहे. स्पॅम कॉल्सची संख्या १५ टक्क्यांच्या दराने वाढत आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतात सर्वांत मोठे स्पॅमर्स तर सर्व्हिस प्रोव्हायडरच आहेत. ते अनेक ऑफर्स आणि रिमाइंडरद्वारे यूजरला त्रस्त करतात. तुम्हीही फोनवर येणाऱ्या नकोशा कॉल्समुळे त्रस्त असाल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करू शकता...

  • कॉल ब्लॉकिंग अॅप्स

प्ले स्टोअरवर अनेक कॉल ब्लॉकिंग अॅप्स मिळतील. काही तर असे कॉल रोखण्यासाठीच तयार केले आहेत. हे अॅप्स लाखो नंबरच्या डेटाबेसवर अवलंबून असतात. या डेटाबेसवरून तुम्हाला कॉल आला तर हे अॅप्स तुम्हाला इशारा देतात. असे कॉल्स थेट व्हॉइसमेलवरही टाकता येतात त्यामुळे तुम्हाला ते ऐकण्याची गरज नसते. गुगल फोन, हिया, ट्रूकॉलर, मि.नंबर, शुड आय आन्सर? यांसारखे अॅप्स विश्वासार्ह आहेत. त्यापैकी काही मोफत आहेत तर काहींचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते.

  • स्पॅम कॉल्सला ब्लॉक करा

जर तुम्हाला काही कंपन्या त्रस्त करत असतील तर आपल्या स्मार्टफोनवरच हे क्रमांक ब्लॉक करू शकता. त्यासाठी अँड्रॉइड अॅपच्या फोन अॅपमध्ये जा, ज्याला ब्लॉक करायचे त्या नंबरवर लाँग प्रेस करा, ब्लॉक किंवा 'अॅड टू ब्लॅकलिस्ट'ला सिलेक्ट करा. जेव्हा कमी कॉल्स तुम्हाला त्रस्त करत असतील तेव्हाच ही पद्धत उपयुक्त आहे अन्यथा अॅप्स हाच उपाय आहे.

  • हेही करू शकता

युजर आपला नंबर डू नॉट डिस्टर्ब डायरेक्ट्रीमध्ये नोंदवू शकतात. एक एसएमएस पाठवावा लागेल. START 0 आणि तो 1909 वर पाठवा.

बातम्या आणखी आहेत...