आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीतही घेतला पौष्टिक आहार, तर होणार नाहीत हृदयासंबंधी आजार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सणवारांच्या काळात पौष्टिक आहार घेणे हृदयरोग्यांसाठी जेवढे गरजेचे आहे तेवढेच सामान्य व्यक्तींसाठी आहे. हृदयरोगी ते सामान्य व्यक्तींनी आहाराकडे लक्ष दिले तर राहू शकतात निरोगी.

सामान्य व्यक्तींनी हे खावे 

न्याहारी

दूध आिण शेंगदाणे घालून दलिया, बदाम, भाज्या, दह्यासोबत पराठा, मोड आलेले मूग किंवा हरबरे, पोहे, संत्री, अंड्ड्याचा पांढरा भाग खावा. 

याचा फायदा

बदामामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे खराब कोलेस्टेराॅलला कमी करते. दलियामध्ये जास्त फायबर असल्यामुळे सहज पचते. संत्र्यामध्ये पोटॅशियम, फोलिक अॅसिड आिण व्हिटॉमिन सी असते. जे कोलेस्टेराॅलला नियंत्रित ठेवते. 

दुपारचे जेवण

दुपारच्या जेवणात मूग किंवा तुरीची डाळ, मल्टिग्रेन कणिक किंवा ज्वारीची भाकरी, पत्ताकोबी, बिन्स, ग्रिल्ड फिश, ब्राउन राइस, हिरव्या भाज्या, गाजर, मटारची भाजी खा.  

याचा फायदा

मूग डाळ पचन आिण मेटाबॉलिज्म वाढवते. यामुळे रक्तपेशीमध्ये कोलेस्टेराॅलची पातळी आिण साठा कमी होतो. ज्वारीची भाकरी खराब कोलेस्टेराॅल कमी करते. माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. यामुळे रक्तातील गाठीमध्ये होत नाही. 

रात्रीचे जेवण

हिरव्या पालेभाज्या , वरण भात, काकडी, ग्रिल्ड चिकन किंवा मासे सायंकाळी खाऊ शकता. मात्र रात्री आठ नंतर ग्रिल्ड व्हेज, सलाद, तंदुरी चिकन, पोळी किंवा भात खाऊ नये. 

याचा फायदा

हिरव्या भाज्यांमधील पोटॅशियममुळे  हृदयासंबंधी होणाऱ्या आजारां संबंधीच्या शक्यता कमी करते. वरण भात पचनास हलके आहे. यामुळे वजनही वाढत नाही. आिण आरोग्यासही चांगले आहे.

हृदयरुग्णांसाठी

न्याहारी

रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या. उपमा, कमी फॅट असलेल्या दुधासोबत दलिया, फळे, सूप, मोड आलेले मूग, सूर्यफूल आिण जवसाच्या बिया. अंड्ड्याचा पांढरा भाग, सलाद. 

याचा फायदा

लसणामुळे कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी होते.. साखर आिण उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.अंड्डयातील पांढरा भाग रक्तदाब, वजन आिण कोलेस्टेराॅल नियंत्रित करते. सूर्यफुलांच्या बियांमध्ये फायटोस्टेरॉल्स असते जे चांगले कोलेस्टेराॅलचे प्रमाण वाढवण्यास सहायक असते. 

दुपारचे जेवण

खिचडी, वरणासोबत एक किंवा दोन पोळ्या, पालक किंवा मेथीची भाजी.जेवणानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून पिणे फायदेशीर आहे. 

याचा फायदा

पालकामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन असते. यात असणारे अँटी ऑक्सिडेंट्स कोलेस्टेराॅलच्या नुकसानदायी ऑक्सिडायजेशनला थांबवते. जेवणानंतर काेमट पाण्यामध्ये लिंबू पाणी टाकून प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामुळे हृदयावर दबाव पडत नाही.  

रात्रीचे जेवण

मिक्स दाळी आिण तांदळाची खिचडी, दलिया, सूप, सलाद, उपमा. साध्या भाताऐवजी ब्राउन राइस घेणे फायदेशीर आहे. 

याचा फायदा

पाल्याभाज्या आिण टोमॅटोचे सूप लठ्ठपणा आिण हृदयासंबंधी समस्यांपासून वाचवण्यास मदत करते. सलादमध्ये असणारे नाइट्रेट्स स्ट्रोक आिण हृदयविकाराची शक्यता कमी करण्यास मदत करते. खिचडीमुळे प्रतिकारशक्ती वाढते.

बातम्या आणखी आहेत...