आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If You Talk Against Narendra Modi And Yogi Adityanath We Will Put You In Grave Alive Raghuraj Singh

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा दिल्या तर जिवंत गाडू'- रघुराज सिंह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रघुराज सिंग उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये श्रमिक मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत

लखनऊ- उत्तर प्रदेश सरकारच्या एका मंत्र्यांच्या एका विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्याविरोधात कोणी काही बोलल्यावर जमिनीत जिवंत गाडू", असे वादग्रस्त विधान योगी सरकारमधील मंत्री रघुराज सिंह यांनी केले आहे. रविवारी अलीगडमध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थानात झालेल्या रॅलीदरम्यान ते बोलत होते.

या विधानावरुन त्यांचा इशारा  अलीगड मुस्लिम यूनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या विरोध प्रदर्शनाकडे होता. विद्यार्थ्यांनी आपल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्याविरोदात घोषणा दिल्या होत्या. यावेळी रघुराज म्हणाले की, ''फक्त 1 टक्का लोक नागरिकत्व कायद्याचा विरोध करत आहेत. हे लोक भारतात राहतात, आपल्या करदात्यांचं खातात आणि आपल्याविरोधातच घोषणा देतात. हा सर्व धर्मांचा आदर करणारा देश आहे, पण आमच्या नेत्यांविरोधात बोलल्यावर आम्ही सहन करणार नाहीत."

सार्वजनिक संपत्तीची नासधुस करणाऱ्यांना गोळी मारू-दिलीप घोष


"उत्तर प्रदेशप्रमाणे आम्हीदेखील सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना गोळी मारू", असे विधान पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी रविवारी केली. पुढे ते म्हणाले की, "उत्तर प्रदेशच्या सरकारने अशा लोकांना फक्त ताब्यात घेतले नाही तर त्यांच्यावर लाठीचार्ज आणि गोळीबारही केला." खडगपूरचे खासदार दिलीप घोष नागरिकत्व कायद्याच्या समर्थानासाठी झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींवर सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहचवणाऱ्यांवर काहीच कारवाई न करण्याचा आरोप लावला आहे. घोष पुढे म्हणाले की, "ते लोक सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहचवत आहेत. ही संपत्ती त्यांच्या बापाची आहे का? सार्वजनिक संपत्ती करदात्यांची आहे. ममता बॅनर्जी याबाबत काहीच बोलत नाहीत. असाम आणि उत्तर प्रदेशमधील आमच्या सरकारने अशा लोकांवर कडक कारवाई केली."