आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात हवा असताे थरार, हरवलेला गाेडवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इरशाद कामिल


बाेलता-चालता एक दगड
यालाच का माणूस म्हणतात?
क्षणाेक्षणी गाेंधळून टाकते
यालाच का जीवन म्हणतात?


जीवन कशाला म्हणतात, कदाचित सबंध आयुष्यभरातील हाच माेठा प्रश्न असावा. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने याचे उत्तर जाणताे, परंतु खरे सांगायचे तर या प्रश्नाचे नेमके उत्तर कुणालाही माहीत नाही. अगदी नकळत एका व्यक्तीने हाच प्रश्न मला विचारला. आकस्मिक विचारणा झाल्यामुळे तत्काळ माैलिक उत्तर सुचले नाही. मी म्हणालाे, निरनिराळे वातावरण-परिस्थितीनुसार जीवनाचा अर्थ बदलत राहताे आणि बदलायला हवाच. माझ्या मते जीवन म्हणजे केवळ कमावणे-खाणे नव्हे, यापेक्षा बरेच काही आहे. त्या क्षणी थातूरमातूर बाेलून मी निसटलाे, परंतु हळूहळू या प्रश्नाने माझ्यात माेठे घर केलेे. निश्चितच कधी ना कधी तुम्हालादेखील हाच प्रश्न पडला असेल की जीवन म्हणतात तरी कशाला? दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणे म्हणजे जीवन? भरपूर पैसा कमावणे? स्वर्ग किंवा स्वर्गासारखे काही मिळवण्याचा हव्यास म्हणजे जीवन? स्वप्न पाहणे, ते पूर्ण करणे, गर्दीचा भाग बनणे किंवा गर्दीपासून दूर जात एकाकीपणाशी झगडत राहणे? अखेर जीवन आहे तरी काय आणि का आहे? काही कळत नाही.


काही बाबींचे न कळणे हेदेखील चांगले असते. परंतु, जर काेणी सतत ताेच प्रश्न विचारून भंडावत असेल तर उत्तर शाेधावेच लागेल. त्याचे खरे उत्तर शाेधायचे तर स्वत:शी प्रामाणिक असावे लागेल. कारण याेग्य अाणि अयाेग्य यामध्ये केवळ दृष्टिकाेनाशिवाय वेगळे काही नाही. एव्हाना मला कळून चुकले की, आपल्यातील जिद्द आणि वेडेपणाचा शाेध घेणे म्हणजेच जीवन. ही जिद्द मग काही बनण्याची, किंवा काही मिळवण्याची असू शकते. खरे तर काही बनणे हेदेखील काही मिळवण्यासारखेच आहे. कदाचित हेच जीवन असावं. आपल्यातील पॅशनचा शाेध आणि त्याचा शाेध घेता घेता प्राणत्याग करणे हेच सर्वात माेठं काम आहे. जिद्द आणि शांती यांच्यात फारसा फरक नाही... जीवनाला नेहमी थरार हवा असताे.


जिद्द आणि शांती यामधील फरक तेव्हाच नाहीसा हाेताे, जेव्हा विचाराने नव्हे तर मनाने जगू शकू. पंजाबी कवी पाश यांनी म्हणून ठेवले आहे की,'प्यार करना और जीना । उन्हें कभी नहीं आ सकता । जिन्हें ज़िन्दगी ने बनिये बना दिया है।' मेंदू नेहमी खरे-खाेटे, कमी-अधिक, चढ-उताराच्या नादी लावताे, आणि मन पावसाच्या पाण्याप्रमाणे कुठल्या कुठे वाहून जाते. आता एक तर घड्याळाचा काटा बना आणि एका मर्यादेत फिरत राहा किंवा स्वत: वेळ बदला आणि बदलत राहा. जर बदल चुकीचा असता तर निसर्गाचा नियम का असता? आपल्या आयुष्यात कायम असणारी बाब म्हणाल तर बदल हीच आहे. एका कुटुंबातील मुलांचे पालनपाेषण सामान्यत: एकसारख्या पद्धतीने हाेते. परंतु, गावातील हिरवाई न एकसारखी असते आणि एकाच कुटुंबातील मुले एकसारखी असतात. आपल्या सर्वांकडे जीवन आहे, विचार आहेत, मन आहे तरीही सर्वांकडे हे सारे एकसारख्या प्रमाणात नाही. पाहा, किती आयुष्य निघून गेले, आणि जे हातून निघून गेले ते जीवन हाेते की नाही? जे शिल्लक आहे त्यात काय ताे रंग, स्वाद, मजा आहे, ज्याचा कधी विचार केला हाेता? दरराेज आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचा आनंद घेता येताे, जणू एखादा मुलगा चाॅकलेटचा शेवटच्या चवीचा आस्वाद जिभेवर घाेळवत असताे.


जगवलं जातंय की वेळी-अवेळी मन कामात गुंतवून घेत आहात? जिंदगी म्हणजे च्युइंगम तर बनली नाही, ज्यातील गाेडवा निघून गेला तरीही त्यास चावणे सुरूच आहे? मात्र आता हे लक्षात घेतलंच पाहिजे की नवा गाेडवा कसा आणता येईल? पुन्हा विश्वास कसा निर्माण करता येईल? ती जाणीव कशी निर्माण करता येईल जी सांगेल जीवन कशाला म्हणतात? माणसांमध्ये माणसांसारखे राहणे कशाला म्हणतात, आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यात काय मजा आहे- चुकीला चूक राहू देण्यात काय मजा आहे. त्या अचानक विचारल्या गेलेल्या प्रश्नाने मी गाेंधळलाे खरा, ज्याचे माैलिक उत्तर मी देऊ शकलाे नाही. परंतु, आंतरिक अस्वस्थतेने मला ब्राझीलमधील कवी मारिओ डी एन्दराद यांच्याकडे खेचून नेले. ते म्हणतात-
आमच्याकडे दाेन जीवन आहेत,


दुसरे तेव्हा सुरू हाेते;
जेव्हा आम्हाला जाणीव हाेते,
की, आमच्याकडे केवळ एकच आहे.


कवि आणि गीतकार इरशाद कामिल
officepost.irshad@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...