आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू इयर पार्टीसाठी वजन कमी करायचे असेल तर करा जंप स्क्वॉट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या पार्टीत सुंदर आणि फिट दिसायचे असेल तर हा व्यायाम नक्कीच तुमच्या कामी येऊ शकतो. जास्त वजनामुळे लोक परेशान असतात. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी जंप स्क्वॉट करायला हरकत नाही. वर्कआऊटची ही मजेदार पद्धत तुम्हाला फिट ठेवण्यास मदतगार ठरेल.

  • कसे करावे

या व्यायामासाठी आपले पाय खांद्याच्या रुंदीपासून थोडे दूर ठेवा. आता स्क्वॉट पोझिशनमध्ये या. त्याच स्थितीत उडी मारा. परत पहिल्या पोझिशनमध्ये उभे राहा. खाली येताना शरीर सैल सोडा, सुरुवातीला तीन ते चार वेळेस करून पाहा. सवय झाल्यावर हळूहळू वाढवा.

  • स्क्वॉटचे वेगवेगळे प्रकार

बॉडीवेट स्क्वॉट
हे करताना पाय खांद्याच्या बरोबरीने ठेवून आणि हात समोर करून जवळजवळ ९० ते १०० अंश इतके खाली बसावे. हा प्रकार करताना कोणत्याही इक्युपमेंटची आवश्यकता नसते. यामध्ये केवळ मूलभूत गोष्टींचे अनुसरण करावे लागते.

सुमो स्क्वॉट
हा प्रकार करताना पाय खांद्यापासून लांब करावे लागतात. कारण खाली बसताना भार मांडीवर पडणे आवश्यक आहे.

बार्बेल स्क्वॉट
यामध्ये तुम्हाला तुमच्या खांद्याच्या मागे बार्बलवर क्षमतेनुसार वजन ठेवून स्क्वॉट करावे लागते.

फ्रंट स्टाइल
यामध्ये समोर जास्त वजन घेऊन स्क्वॉट करावे लागते. त्यामुळे हा प्रकार बॅक स्क्वॉटपेक्षा कठीण आहे.

  • जंप स्क्वॉटचे फायदे

फॅट बर्न होते
यास चरबी बर्नरदेखील म्हटले जाते. कारण या व्यायामामुळे चरबी लवकर बर्न होते. चयापचय क्रिया सुधारते. केवळ कंबरच नाही तर हिप्स, हात आणि पोटाची चरबीदेखील कमी होते.

  • संतुलन चांगले राहते

शरीर संतुलित ठेवण्यासाठी जंप स्क्वॉट खूप फायदेशीर आहे. यामुळे सांधे आणि हाडे ताणले जातात, या दोन्ही अवयवांवर ताणा पडल्यामुळे शरीर संतुलित राहते. तसेच पाठदुखी दूर होण्यासही मदत होते.

  • तणाव दूर होतो

या व्यायाम प्रकारास स्ट्रेस बुस्टर असेदेखील म्हटले जाते. यामुळे शरीरात एंडोर्फिन हॉर्मोनची निर्मिती होते आणि हे एक नैसर्गिक पेनकिलर आहे. या व्यायामामुळे तणाव दूर होतो.

  • शरीर बळकट होते

ऑफिसमध्ये ८ तास बसून काम केल्यामुळे शरीराचा पोश्चर बिघडतो. यामुळे पाठ आणि कंबरेत वेदना होत असतात. हा व्यायाम केल्याने या समस्या दूर होतात आणि शरीर मजबूत होते. नियमित केल्याने पोश्चर सुधरते.

सावधगिरी बाळगा
- हा व्यायाम करताना आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यावी.
- तज्ञांच्या देखरेखीखाली हा व्यायाम करावा. मनाने कोणताच व्यायाम करू नये.

बातम्या आणखी आहेत...