आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करायचे, मग करून पाहा हे उपाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात, परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. येथे जाणून घ्या, छोटे छोटे उपाय ज्यामुळे ७ दिवसांत तुमचे वजन कमी होऊ लागेल.... लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होत नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. व्यायाम करणे, पायी चालणे हे उपाय आपण करतो, पण काही घरगुती उपायांनी देखील आपण वजनावर नियंत्रण करू शकतो आणि लठ्ठपणा कमी करू शकतो. - पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. - दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे. - पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल. - आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल. - वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दूध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते. - दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा. - वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्त प्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गाजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या. - जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीत तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये. - दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याच्या नादात ब्रेकफास्ट करत नाहीत, परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नयेत. -  दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील वसा कमी होण्यास मदत होते. - सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसूतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.

बातम्या आणखी आहेत...