आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : गेल्या वर्षी अनेक भारतीय सिने दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला. या सर्व दिवंगत सेलिब्रिटींनी भारतीय सिनेमाच्या विविध क्षेत्रात आपली अमीट छाप सोडली. त्यामुळे ५०व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (आयएफएफआय) भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान देणाऱ्या 13 दिवंगत सेलिब्रिटींचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व चित्रपट इफ्फीच्या श्रद्धांजली विभागात दाखवले जातील.
'इफ्फी रिमेम्बर्स' सेक्शनअंतर्गत दाखवले जाणारे चित्रपट...
अपारूपा | बिजु फूकन |
भुवन शोम | मृणाल सेन |
एक अनेक और एकता | विजया मुलय |
गणाशत्रु | रुमा गुहा ठाकुर्ता |
हम | कादर खान |
हम आपके हैं कौन | राज कुमार बड़जात्या |
कनूरी हेग्गाहिथी | गिरीष कर्नाड |
कृष त्रिष ऐंड बालित बॉय : फ़ेस फियर्स | राम मोहन |
फूल और कांटे | वीरू देवगन |
रजनीगंधा | विद्या सिन्हा |
द टाइडल | विजया मुलय |
उमराव जान | ख्य्याम |
वेइलमारंगल | एम. जे. राधाकृषगणन |
महत्त्वाचे म्हणजे ७६ देशातील २०० पेक्षा जास्त चित्रपट ५० व्या इफ्फीमध्ये दाखवले जातील. यापैकी २६ फिचर सिनेमे आणि १५ चित्रपट बिगर फिचर श्रेणीत दाखवले जातील.हा सोहळा 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यातील पणजी येथे हे आयोजन होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.