आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'IFTDA' Has Written A Letter To Prime Minister Narendra Modi Asking To Honor The Bollywood As Industry

'IFTDA' ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बॉलीवूडला इंडस्ट्रीचा दर्जा देण्याची मागणी केली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मेला आपले कॅबिनेट मंत्र्यांसोबत दिल्लीमध्ये शपथ घेणार आहेत. शपथ ग्रहण समारंभाची तयारी जोरात चालू आहे. याचप्रमाणे इंडियन फिल्म अँड टेलीविजन डायरेक्टर्स एसोसिएशन (IFTDA)ने पीएमला पत्र लिहून बॉलिवूड इंडस्ट्रीचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. ही मागणी नवी नाही आणि यापूर्वीही अनेकदा पंतप्रधानांसमोर मांडला गेला आहे. मात्र यावेळी IFTDA ला अपेक्षा आहे की, ही मागणी मेनी केली जाईल. 

 

पत्रात लिहिले गेले आहे की, 'आम्ही तुला हे सांगतो आहोत की, भारतीय फिल्म इंडस्ट्रीला आतापर्यंत इंडस्ट्रीचा दर्जा मिळालेला नाहीये. आमच्या चित्रपटांची क्वालिटी हॉलिवूड चित्रपट आणि देशातील चित्रपटांच्या बरोबरीची आहे. पण अजूनही आमच्या इंडस्ट्रीला तो दर्जा मिळालेलं नाही, ज्याचा आपल्याला हक्क आहे. आमच्या अपेक्षा आता तुमच्याकडून आहे आणि अपेक्षा आहे की तुम्ही, भारतीय सिनेमाच्या उज्वल भविष्यासाठी आणि बदलांसाठी प्रत्येक योग्य ते पाऊल घ्याल.' 

 

IFTDA चे अध्यक्ष अशोक पंडित यांनी सांगितले, 'सध्याच्या काळात काही मुद्दे सोडवण्याची खूप गरज आहे. आम्ही कित्तेक दिवसांपासून इंडस्ट्रीच्या दर्जासाठी संघर्ष करत आहोत आणि यावेळी आम्हाला अपेक्षा आहे की, आमची मागणी पूर्ण केली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...