आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक रनवे 13 दिवस राहणार बंद; हवाई प्रवास महागला, तिकीट दरांत 86% पर्यंत वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर डागडुजीचे काम सुरू असल्याने रनवे (27/9) 13 दिवसांसाठी बंद राहणार आहे. हा रनवे तिन्ही टर्मिनलशी संबंधित आहे. रनवे बंद असल्यामुळे 100 फ्लाइट तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या. परिणामी फ्लाइटच्या तिकीट दरांमध्ये तब्बल 86 टक्के पर्यंतची वाढ करण्यात आली आहे. हे वाढीव दर पुढील आठवड्यात सुद्धा लागू राहणार असे सांगितले जात आहे. याचा सर्वाधिक फटका दिल्लीवरून उड्डान घेणाऱ्या आणि दिल्लीला येणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

 

122% वाढ होण्याची शक्यता

- इक्जिगोचे सीईओ आणि को-फाउंडर अलोक बाजपेयी यांनी सांगितल्याप्रमाणे, शुक्रवारी संध्याकाळी अनेक ट्रॅव्हेल पोर्टलवर हवाई भाडे वाढवल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्येक वीकेंडला दिल्ली ते बंगळुरूचे भाडे 11,044 रुपये एवढे असते. पण, शनिवारी याच फ्लाइटसाठी भाडे सरासरी 13,072 वर पोहोचले आहे. सोबतच, दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या वनवे फ्लाइटचे तिकीट सरासरी 9,228 रुपये एवढे आहे. तेच आता किमान 11,060 रुपयांवर गेले आहे.

- बाजपेयींनी सांगितल्याप्रमाणे, पुढील 13 दिवस बेंगळुरूला जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर 122% पर्यंत वाढू शकतात. तर हैदराबादच्या हवाई तिकीट दरांत 57% ची वाढ होऊ शकते. एक रनवे बंद असल्याने पुढील आठवडाभर त्यातही प्रामुख्याने 16 ते 19 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीहून मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नईसह इतर ठिकाणी जाणाऱ्या फ्लाइटचे तिकीट दर वाढणार आहेत. 

 

16 नोव्हेंबर रोजी दिल्लीहून जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर

डेस्टिनेशन भाडे (रुपयांत)
मुंबई 19-30 हजार
कोलकाता 10-20 हजार
हैदराबाद 6-13 हजार
बेंगळुरू 15-28 हजार
चेन्नई 6-11 हजार

   

 

17 नोव्हेंबर रोजी दिल्लीला येण्याचे भाडे

डेस्टिनेशन भाडे (रुपयांत)
मुंबई 9-37 हजार
कोलकाता 9-25 हजार
हैदराबाद 6-9 हजार
बेंगळुरू 9-25 हजार
चेन्नई 6-16 हजार

 

बातम्या आणखी आहेत...