आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूर-भोपाळ येथे होणारा आयफा पुरस्कार सोहळा लांबणीवर, नवीन तारखांची घोषणा नंतर होईल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा कार्यक्रम 21 मार्च रोजी भोपाळ येथे आणि इंदूरमध्ये 27 ते 29 मार्च दरम्यान होणार होता.
  • मध्य प्रदेशलाच मिळणार पाहुणचाराचा मान
  • लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता निर्णय

मुंबईः जगभरातील बहुतेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण पाहता मध्य प्रदेशात होणारा आयफा पुरस्कार 2020 पुढे ढकलण्यात आला आहे. शुक्रवारी आयोजकांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की लवकरच नव्या तारखांची घोषणा केली जाईल.


जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "COVID - 19 विषाणूविषयीची वाढती चिंता आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचे आणि आरोग्यास लक्षात घेऊन आयफा मॅनेजमेंट आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी मध्य प्रदेश सरकारशी चर्चा केल्यानंतर हा सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च 2020 च्या शेवटी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता."

मध्य प्रदेशलाच मिळणार पाहुणचाराचा मान

आयोजकांनी म्हटले की, "मध्य प्रदेशात होणार्‍या या पुरस्कारांच्या नवीन तारखा व योजना लवकरच जाहीर केल्या जातील. आयफाच्या जादूचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून आलेल्या सर्व चाहत्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आयफा पूर्णपणे वचनबद्ध आहे. आपल्‍याला होणार्‍या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आशा करतो की सर्व संबंधित लोक परिस्थितीची संवेदनशीलता समजून घेतील."

मुख्य कार्यक्रम इंदूर येथे होणार होता

21 व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड (आयफा) 27 ते 29 मार्च दरम्यान इंदूरमध्ये होणार होता. बुधवारी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात नामांकन, होस्ट व परफॉमर्सची यादीही जाहीर करण्यात आली. त्या अनुषंगाने सलमान खान, रितेश देशमुख, मनीष पॉल आणि सुनील ग्रोव्हर एकत्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार होते तर शाहरुख खान, कार्तिक आर्यन, हृतिक रोशन, करीना कपूर, जॅकलिन फर्नांडिज आणि कतरिना कैफ येथे सादरीकरण करणार आहेत. या सोहळ्यात एकूण 11 प्रकारात श्रेणीत पुरस्कर दिले जाणार आहेत. आयफा पुरस्कार सोहळ्याची सुरुवात 21 मार्च रोजी भोपाळमध्ये म्युझिकल नाईटपासून होणार होती. बॉलिवूडमधील अनेक गायक यात सादरीकरण करणार होते. 

कोरोनाचे 31 संशयित भारतात आढळले

भारतात कोरोना व्हायरस-संक्रमित रुग्णांची संख्या 31 झाली आहे. शुक्रवारी दिल्लीत दुसर्‍या रुग्ण आढळला आहे. आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार म्हणाले की, संक्रमित व्यक्तीने थायलंड आणि मलेशियाचा प्रवास केला आहे. ती व्यक्ती दिल्लीतील उत्तम नगर येथील आहे.

बातम्या आणखी आहेत...