आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास महिलांसाठी 10 रुपयांत बनवला \'stand and pee\' डिव्हाइस, घाण वाशरूममध्ये उभे राहून करता येईल लघुशंका...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - 20 नोव्हेंबर जगभरात 'वर्ल्ड टॉयलट डे' साजरा करण्यात आला. या प्रसंगी आम्ही तुम्हाला अशा डिव्हाइइसबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे महिलांना पब्लिक टॉयलेट वापरने सोपे जाणार आहे. 'Stand And Pee' हे उपकरण IIT दिल्लीच्या एका विद्यार्थ्याने तयार केले. त्याने सोमवारीच हे डिव्हाइस लॉन्च केले आहे. Safne म्हणजेच Sanitation For Female नावाच्या या डिव्हाइसने महिला घाणेरड्या आणि दुर्गंधित टॉयलेटमध्ये सुद्धा उभे राहून लघुशंका करू शकतील. वन टाइम यूज असलेल्या या डिव्हाइसची किंमत फक्त 10 रूपये आहे. याला #StandUpForYourself  कम्पेनसह लॉन्च केले आहे. या अंतर्गत देशभरातील 1 लाखांपेक्षा अधिक महिलांना याचे सम्पल मोफत दिले जाणार आहेत.

 

अनेक आजारांचे कारण आहे घाण वॉशरूम

युरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन सारखा महिलांना होणारा आजार घाण पब्लिक वॉशरुम वापरामुळे होतो. पब्लिक टॉयलेटचा वापर करणाऱ्या प्रत्येक दोन पैकी एका महिलेला हे इंफेक्शन होते. हीच गोष्ट लक्षात ठेवून विद्यार्थ्याने हे डिव्हाइस बनवले आहे.

 

पुढे वाचा- गरोदर महिलांसाठी आहे फायदेशीर...

 

 

बातम्या आणखी आहेत...