आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IIT Students Living In Slums; The Purpose Of Making Useful Items For The Poor, 200 Children Did Course In 5 Years

आयआयटीचे विद्यार्थी झोपडपट्टीत राहताहेत; गरिबांसाठी उपयुक्त वस्तू बनवणे हा उद्देश, 5 वर्षांत 200 मुलांनी केला कोर्स आतापर्यंत या प्रकारचे नवीन उपक्रम झाले

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

दिल्ली : सम्यक जैन दिल्लीत कामगारांसह काम करत आहेत. दगड उचलून दूर ठेवत आहेत. मात्र हे कोणी कामगार नसून आयआयटीचे विद्यार्थी आहेत. हा आयआयटी दिल्लीच्या कोर्स इन्क्लुझिव्हचा भाग आहे. हा अभ्यासक्रम पाच वर्षांपासून सुरू आहे. या अभ्यासक्रमाचे प्राध्यापक पी.व्ही.मधुसूदन राव सांगतात, या गरजूंना मदत होईल असे काहीतरी नवीन साकारणे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहेत. आतापर्यंत या अभ्यासक्रमासाठी २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यांना नवीन कल्पना साकारण्यासाठी कॅम्पसच्या बाहेर जाण्यास सांगितले आहे. काही वेळ झोपडपट्टीत राहण्यास, रिक्षाचालक व कामगारांसारखे आयुष्य जगण्यास. शेतापासून ते मंडईपर्यंत शेतकऱ्यांसोबत वेळ घालवण्यास सांगितले आहे.

राव सांगतात, या प्रक्रियेमुळे गरीब व मजुरांशी संबंधित ५० हून अधिक नवकल्पना गेल्या पाच वर्षात येथे साकारल्या गेल्या आहेत. इतकेच नाही तर कॉर्पोरेट कंपनीच्या प्लेसमेंटमध्ये भाग घेण्याऐवजी, या अभ्यासक्रमात प्रवेश घेणारे सुमारे एक चतुर्थांश विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांशी संबंधित आहेत. दरवर्षी ४० विद्यार्थी तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षांत या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. राव सांगतात की, सुरुवातीच्या काळात मुले दिव्यांग लोकांशी बोलत होती, इंटरनेटवर सर्फिंग करून नवीन बाबी शोधत होती. पण वेगळे काही सापडले नाही. सततच्या संभाषणामुळे नवीन सामाजिक नावीन्यपूर्ण कल्पनांसाठी प्रयोगशाळेच्या बाहेर पडण्यास सुरुवात झाली. काही काळ कॅम्पसपासून दूर राहावे लागेल. जे आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासोबत राहावे लागेल. या प्रक्रियेमुुळे चांगले परिणाम बघायला मिळाले. हा देशातील एकमेव अभ्यासक्रम आहे जिथे गरजू लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांच्यात राहावे लागते, असे राव यांनी स्पष्ट केले. अभ्यासक्रमाचा कालावधी सध्या सहा महिन्यांचा आहे, त्यामुळे या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षापर्यंत वाढवण्याचा विचार केला जात असल्याचे राव यांनी सांगितले. या अभ्यासक्रमात सामाजिक विज्ञानदेखील शिकवले जाते, जेणेकरून विद्यार्थी समाज व मानवी वर्तनाला समजून नावीन्यपूर्ण कल्पना साकारतील.

आतापर्यंत अशा प्रकारचे झाले इनोव्हेशन

  • रिक्षाचालकांसाठी - विद्यार्थ्यांनी रिक्षात झोपून रिक्षाचालकांना आराम मिळण्यासह प्रवासी बसवण्याची व्यवस्था कशी करता येईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रिक्षाचे सीट व मॉडेलमध्ये थोडे बदल केले. त्यामुळे रिक्षाचालक आराम करतानादेखील शरीराला सरळ करू शकतील. तसेच प्रवाशांनाही बसवू शकतील.
  • कामगारांसाठी - दिल्लीतील एका बांधकामाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काही आठवडे वेळ घालवला. तिथे कामगारांच्या कामाची पद्धत समजून घेतली. कुठलीही जड वस्तू हाताने उचलून खांद्यावर किंवा डोक्यावर ठेवल्यास कंंबरदुखी होेते, हे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे विद्यार्थ्यांनी एक लहान व स्वस्त उपकरण बनवले. यामुळे कामगार न वाकता सामान उचलू शकतील.
  • शेतकऱ्यांसाठी - विद्यार्थ्यांनी राजस्थानच्या लहसूनमधील शेतकऱ्यांसोबत काम केले. त्यांनी शेतापासूून ते मंडईपर्यंत शेतकऱ्यांसोबत वेळ घालवला. यात शेतकरी ज्या दरात दलालाला लसूण देतो, त्यापेक्षा ८० टक्के जास्त दराने व्यापारी ग्राहकाला लसणाची विक्री करतो हे दिसून आले. दलाल मागणी व पुरवठ्याच्या हिशेबाने मालाची बाजारात विक्री करतो. कारण त्याच्याजवळ कूलिंग व साठा करण्याची सुविधा असते. शेतकरी एकत्रितपणे साठा करू शकतील, असे मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केले.
बातम्या आणखी आहेत...