आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IKEA Finally Opened In Hyderabad, India; Following Rush, Cops Issue Traffic Curbs

भारतात उघडलेल्‍या या शोरुममध्ये पहिल्‍याच दिवशी आले 30 हजार लोक, अखेर असे काय आहे यामध्‍ये, रस्‍त्‍यावर लागल्‍या लांबच लांब रांगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- स्‍वीडिश फर्नीचर कंपनी आयकियाने (IKEA) आपला पहिला स्‍टोअर हैदराबाद येथे सुरू केला आहे. पहिल्‍याच दिवशी या स्‍टोअरमध्‍ये खरेदी करण्‍यासाठी 30 हजार लोक आले होते. यामुळे या स्‍टोअरजवळील ट्रॅफिक पुर्णपणे जाम झाले होते. गर्दीसोबतच ट्रॅफिकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्‍हायरल होत आहेत. शोरुमच्‍या आत जाण्‍यासाठी बाहेर लोकांची मोठी रांग लागली होती. आत जाण्‍यासाठी लोकांमध्‍ये थोड्याफार प्रमाणात धक्‍काबुक्‍कीही झाली. हैदराबादमधील हा स्‍टोअर जवळपास 13 एकरमध्‍ये पसरलेला आहे.


काय होते या शोरूमध्‍ये
आयकिया आपल्‍या बेस्‍ट क्‍वॉलिटी फर्नीचरसाठी ओळखले जाते. या फर्नीचरची किंमतही अतिशय कमी असते. यामुळेच पहिल्‍याच दिवशी स्‍टोअरमध्‍ये लोकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली. तेलंगणाचे उद्योग मंत्री के.टी.रामाराव यांनी स्‍टोअरचे उद्घाटन केले होते. यावेळी आयकिया ग्रुपचे सीईओ जेस्‍पर ब्रोडिनही उपस्थित होते. त्‍यांनी दररोज 30 ते 35 हजार ग्राहक स्‍टोरमध्‍ये येण्‍याची यावेळी अपेक्षा केली होती.


देशभरात ओपन होणार 40 स्‍टोअर्स
देशभरातील आणखी 40 शहरांमध्‍ये आयकिया स्‍टोअर ओपन केले जाणार आहेत. मात्र यासाठी वेळ लागणार आहे. 2025पर्यंत कंपनी 25 स्‍टोअर ओपन करण्‍ णार आहे. पुढील स्‍टोअर मुंबईमध्‍ये जून 2019 पर्यंत ओपन होर्इल. यानंतर बंगळुरू, गुरूग्राम येथे स्‍टोअर ओपन केले जातील. तर भविष्‍यात अहमदाबाद, सूरत, पुणे, चेन्‍नइ र् आणि कोलकातासह इतर ठिकाणी 40 स्‍टोअर्स ओपन केले जातील.

 

1000 वस्‍तूंची किंमत आहे 200 रूपयांच्‍या आत    
आयकिया स्‍टोअरमध्‍ये 7500 प्रॉडक्‍ट्सची विक्री केली जात आहे. यातील 1000 प्रॉडक्‍ट्सची किंमत 200 रुपयांच्‍या आत आहे. आय‍कियाचे 1000हून अधिक प्रॉडक्‍ट्सची निर्मिती भारतातच करण्‍यात आली आहे. या स्‍टोअरमध्‍ये 1000 सीट्सचे रेस्टॉरंट आहे. येथे 149 रूपयांत स्‍वीडनची फेमस मीटबॉल्‍सही मिळते. यासोबतच 99 रुपयांत तुम्‍हाला बिर्यानी टेस्‍ट करता येते. येथे 69 रुपयांपासून पुढे वस्‍तू मिळतात.

बातम्या आणखी आहेत...