आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट अपघातानंतर जखमी प्रवाशाची 30 लाखांच्या भरपाईची मागणी, हवेच्या दाबामुळे नाक-कानातून झाला होता रक्तस्राव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जेट एअरवेजच्या विमानात केबीन क्रू हवेचा दाब नियंत्रण करणारे स्विच सुरू करण्यास विसरल्याने प्रवाशांना नाक-कानातून रक्तस्रावाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर विमान पुन्हा मुंबईकडे वळवले आणि विमानतळावर प्रवाशांवर उपचार करण्यात आले. तर पाच प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या पाचपैकी एका प्रवाशाने 30 लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. एअरलाईनने योग्य प्रकारे काळजी घेतली नसल्याचा आरोप या प्रवाशाने केले असल्याची माहिती, सुत्रांनी दिली आहे. 

 

धमकावल्याचा आरोप..

नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या प्रवाशाने जेट एअरलाईन कंपनीला धमकावल्याचेही सांगण्यात येत आहे. आपल्या मागणया पूर्ण झाल्या नाही तर फ्लाईटमध्ये जेव्हा ही समस्या निर्माण झाली होती, त्यावेळी तयार केलेला व्हिडिओ मीडियाकडे शेअर करण्याची धमकी त्याने दिल्याचे समजतेय. नियमानुसार प्रवाशांना काही इजा झाली तर एअरलाईन कंपनीला नुकसान भरपाई द्याली लागत असते. 


100 व्हाऊचर्सचीही मागणी 
या प्रवाशाने जेट एअरवेजकडे 30 लाख रुपये नुकसान भरपाईबरोबरच अतिरिक्त 100 अपग्रेड व्हाऊचर्सचीही मागणी केली आहे. या व्हाउचर्सच्या मदतीने त्याला इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणे शक्य होईल. .


केबीन क्रू हवेच्या दाबावर नियंत्रण ठेवणारा स्विच सुरू करण्यास विसरल्यामुळे गुरुवारी जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. जवळपास 30 प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्तस्राव झाला होता. या विमानामध्ये केबीन क्रू आणि प्रवाशांसह एकूण 171 जण प्रवास करत होते. 

 

प्रवाशांच्या तक्रारी 

दरम्यान विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर विमानतळावर नेमके पुढे काय करायचे हेच प्रवाशांना कळत नव्हते. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठीही कोणीही उपस्थित नव्हते. उपचारांसाठी काय सोय केली आहे, किंवा कुठे जायचे हे प्रवाशांना कळत नव्हते. जेट एअरवेजच्या यासावळ्या गोंधळाबाबत काही प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली. 

 

Just had an emergency landing I the crew acts unprofessional the ground staff clueless n no sr rep at site to guide.#jetairways #9w697 pic.twitter.com/m7prsmIGIj

— Amit relan (@RelanAmit) September 20, 2018

 

 

बातम्या आणखी आहेत...