आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावमध्ये बेकायदा गर्भपात केंद्राचा पर्दाफाश; रुग्णालयातून छापा टाकून स्त्री जातीचे मृत भ्रूण जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- सटाणानाका भागातील चिंतामणी हाॅस्पिटलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा गर्भपात केंद्राचा पाेलिसांनी पर्दाफाश करुन काही जणांना ताब्यात घेतले. कॅम्प विभागाचे पाेलिस अधीक्षक अजित हगवणे यांनी रविवारी मध्यरात्री दाेन वाजता हाॅस्पिटलवर छापा टाकून एक स्त्री जातीचे मृत भ्रूण जप्त केले. 


नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील बेकायदा गर्भपात प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले. ताेच फाॅर्म्युला वापरून मालेगाव शहरातही बेकायदा गर्भपात हाेत असल्याच्या तक्रारी पाेलिस प्रशासनाला प्राप्त झाल्या हाेत्या. शहरातील चिंतामणी हाॅस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या हाेत असल्याची विश्वसनीय माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. या माहितीच्या अाधारे पाेलिस उपअधीक्षक हगवणे यांनी हाॅस्पिटलवर छापा टाकला. मध्यरात्री एका महिलेचा गर्भपात केला जात असल्याचे निदर्शनास अाले. गर्भपात करून हत्या केलेले स्त्रीजातीचे अर्भकही घटनास्थळी अाढळून अाले. पाेलिसांनी मृत अर्भक व अन्य साहित्य ताब्यात घेऊन केंद्र सील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...