अवैध गुरांची वाहतूक / अवैध गुरांची वाहतूक करणारे वाहन उलटले

प्रतिनिधी

Jan 15,2019 12:10:00 PM IST
तिवसा - अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जनावरांची अवैध वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहन पलटी होऊन एका जनावराचा मृत्यू व १० जनावरे जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उशीरा तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ममदापूर फाट्यावर घडली घडली. अमरावतीवरून नागपूरकडे बोलेरो पिकअप वाहनाने (एमएच ३०/ एबी १७०४)निर्दयतेने कोंबून ११ जनावरांची वाहतूक करण्यात येत होती. भरधाव वेगातील वाहन ममदापूर फाट्याजवळ अनियंत्रित होऊन थेट रस्त्यतालगत असलेल्या खड्डयात पलटी झाले. यामध्ये १ जनावराचा मृत्यू झाला, तर १० जनावरे जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालक वाहन व जनावरे सोडून पसार झाले. माहिती मिळताच तिवसा पाोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी जनावरांना वाहनाद्वारे केकतपूर येथील गोरक्षणमध्ये उपचारार्थ दाखल केले. पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

X
COMMENT