maharashtra local news / ट्रकमधून वाहतूक; ५७ लाखांचा गुटखा जप्त, उत्तर प्रदेशातील दोघांवर गुन्हा दाखल

१९१ पोती गुटख्याची किंमत ४७ लाख ७० हजार रुपये आहे तर ९ लाख ट्रकची किंमत आहे

प्रतिनिधी

Jul 21,2019 09:16:00 AM IST

सोलापूर-सोलापुरातील शानदार चौकातून संशयितरीत्या जाणारा ट्रक (एम एच १२ केपी ९२९४) अडवून पोलिसांनी चौकशी केली असता, त्यात १९१ पोती गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू दिसून आले. वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. अमरनाथ शिवलालजी पाल आणि ट्रकमालक निजाम (रा. दोघे, जिराहपारा, मिर्झापूर, उत्तर प्रदेश ) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


ही कारवाई शनिवारी सायंकाळी सदर बझार पोलिसांनी केली. शानदार चौकातून ट्रक जात होता, पोलिसांनी आडवून त्याची चौकशी केली असता त्यात विविध प्रकारचे १९१ गुटखा जप्त केले. ट्रकचालक अमरनाथ याच्याकडे चौकशी सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे हा गुटखा तपासण्यासाठी देण्यात आल्या आला आहे.

ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त महावीर सकळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, फौजदार ईश्वर कोकरे यांच्यासह उद्धव घोडके, पोपट बोराटे, सचिन म्हेत्रे, दीपक चव्हाण, मिलिंद मिठ्ठापल्ली, जुबेर तांबोळी या पथकाने केली.

X
COMMENT