आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आैरंगाबाद-धुळे महामार्गावर दीड काेटीचा मद्यसाठा जप्त, श्रीलंकेत जाणा ऱ्या मद्याची परस्पर विक्री करण्याचा डाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भारतात उत्पादित झालेले अाणि केवळ विदेशात तेही श्रीलंकेत विक्रीसाठी तयार करण्यात अालेल्या विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या दाेन कंटेनरचालकांना मुंबई विमानतळाच्या दिशेने न जाता धुळे- औरंगाबाद रस्त्यावरील मेहुणबारे बसस्थानकाजवळ थांबवले.  मद्याची परस्पर विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक भरारी पथकाने उधळून लावला. कारवाईत सुमारे दीड काेटीचा मद्यसाठा व दाेन कंटेनर ताब्यात घेण्यात आले.  


यासंदर्भात, नाशिकच्या भरारी पथकास गाेपनीय माहिती मिळताच धुळे-औरंगाबादरोडवर सापळा रचण्यात अाला हाेता. विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव, धुळ्याचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे बसस्थानकाजवळ संशयावरून मद्य वाहतूक करणारे कंटेनर अडविण्यात अाले. यात सुरुवातीला मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला मार्ग दाखवणारे (एचआर ९३, २२१३) क्रमांकाचे वाहन पथकाने पकडले. त्यातील संशयितांकडे कंटेनरच्या कागदपत्रांची चाैकशी करीत त्यांनी मद्यसाठा मागून कंटेनरमधून येत असल्याचे सांगितले. पथकाने काही वेळातच कंटेनरही ताब्यात घेतले. कंटेनरची तपासणी केली असता त्यात फक्त श्रीलंकेत विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला. कंटेनरचालकाची कसून चौकशी केल्यावर त्याच्याकडे पंजाबमधील धीरज ट्रान्सपोर्ट कंपनीचे बिल, वाहतूक परवाना मिळाला. मद्यसाठ्याची पावतीत फेरफार आढळून  आले आहे. 


दीड हजार खाेके हस्तगत 
कंटेनरसह त्यातील कोट्यवधी रुपयांचा अवैध मद्यसाठाही जप्त केला. परदेशात विक्रीस परवानगी असलेले ७५० मिली. क्षमतेचे एक हजार ५०० बॉक्स आणि इतर मद्याच्या २४ बाटल्या असा एकूण एक कोटी ४२ लाख २ हजार ९१२ रुपयांचा मद्यसाठा अाणि २१ लाखांचा दहाचाकी कंटेनर आणि कार आणि २५ हजारांचे सहा मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी तपासासनुसार हा मद्यसाठा महाराष्ट्रात विक्री करणार असल्याचे समोर येत आहेत. सहा संशयितांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला असून हा मद्यसाठा काेणााच्या सांगण्यावरून अाणि काेण खरेदी करणार हाेता याचाही शोध घेतला जात अाहे.

बातम्या आणखी आहेत...